महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Molestation : तरुणीचा विनयभंग; फिजिओथेरेपिस्टला अटक - राजापेठ पोलिस

शहरातील राजापेठ परिसरातील खासगीरुग्णालयात कार्यरत एका ३८ वर्षीय फिजीओथेरपिस्टने एका तरुणीचा विनयभंग (Molestation of a young woman) केल्याची घटना उघडकीस आली . या प्रकरणी पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीवरुन राजापेठ पोलिसांनी (Rajapeth Police) या फिजीओथेरपिस्टला अटक (Physiotherapist arrested) केली आहे.

Nurse molestation
परिचारिकेचा विनयभंग

By

Published : May 31, 2022, 2:31 PM IST

अमरावती:आशीष त्र्यंबकराव चौधरी (३८, रा. विश्राम नगर, साईनगर, अमरावती) असे पोलिसांनी अटक केलेल्या फिजीओथेरपिस्टचे नाव आहे. मंगळवारी दुपारी आरोपी आशिषने २१ वर्षीय पीडित तरूणीला तुला शिकवतो, असे सांगितले. नंतर त्याने तीला शिकवण्याला सुरूवात केली. मात्र फिजीओथेरपीचे धडे देत असतानाच तरुणीसोबत असभ्य वर्तन सुरू केले (Molestation of a young woman). त्याने चालवलेल्या प्रकारामुळे तरूणीला धक्का बसला. या प्रकरणी पीडित तरूणीने तत्काळ राजापेठ पोलीस (Rajapeth Police) ठाणे गाठले आणि पोलिसांना हा घटनाक्रम सांगितला.

त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी रुग्णालय गाठले व आशीष चौधरीला ताब्यात घेतले. या प्रकरणी पीडितेने दिलेल्या तक्रारीवरुन फिजीओथेरपिस्ट आशिष चौधरीविरुध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे. या घटनेने शहरातील वैद्यकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी डॉक्टरला धारेवर धरले ज्या रुग्णालयात हा प्रकार घडला त्या रुग्णालयात युवा सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल मांडवडे यांच्या नेतृत्वात डॉक्टरांना जाब विचारण्यात आला. असा प्रकार होत असेल तर खपवुन घेतले जाणार नाही असा इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details