अमरावती- जुन्या शहरात भाजीबाजार परिसरात रामकृष्ण अपार्टमेंटच्या गच्चीवर असलेल्या मोबाईल टॉवरला शनिवारी दुपारी भीषण आग लागली. परिसरातील नागरिकांचा या मोबाईल टॉवरला अनेक दिवसांपासून विरोध होता. त्यातच आता टॉवरला आग लागल्याने नागरिकांचा रोष उफाळून आला आहे.
अमरावतीच्या भाजीबाजार परिसरातील मोबाईल टॉवरला आग - अमरावती
अतिशय दाट वस्ती असणाऱ्या भाजीबाजारात रामकृष्ण अपार्टमेंटवरच्या मोबाईल टॉवर शेजारी असणाऱया नियंत्रण कक्षाने अचानक पेट घेतला. यानंतर मोबाईल टॉवरही जळायला लागला. परिसरातील नागरिकांचा या मोबाईल टॉवरला अनेक दिवसांपासून विरोध होता. त्यातच आता टॉवरला आग लागल्याने नागरिकांचा रोष उफाळून आला आहे.
अतिशय दाट वस्ती असणाऱ्या भाजीबाजारात रामकृष्ण अपार्टमेंटवरच्या मोबाईल टॉवर शेजारी असणाऱया नियंत्रण कक्षाने अचानक पेट घेतला. यानंतर मोबाईल टॉवरही जळायला लागला. परिसरातील नागरिकांनी टॉवरला आग लागल्याची माहिती अग्निशामक दलाल माहिती दिली. अग्निशामक दलाने घटनास्थळ गाठून आगीवर नियंत्रण मिळविले.
टॉवरला आग लागलेल्या अपार्टमेंटमध्ये खामगाव अर्बन बँकेची शाखा आहे. सुदैवाने या आगीची झळ बँकेला बसली नाही. भाजीबाजार येथील या मोबाईल टॉवरला नागरिकांचा विरोध होता. या घटनेनंतर नागरिकांचा रोष उफाळून आल्यावर त्यांनी महापालिका कर्मचाऱ्यांशी वाद घातला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन लोकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मोबाईल टॉवरला आग नेमकी कोणत्या कारणाने लागली ते स्पष्ट होऊ शकले नाही.
: