अमरावती- कोरोनाचा नायनाट करण्यासाठी अमरावतीत गुरुवारपासून 'डॉक्टर आपल्या परिसरात' हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत शहरातील प्रत्येक परिसरात मोबाईल रुग्णवाहिकेची सोय करण्यात येणार आहे. तसेच, डॉक्टर प्रत्येक परिसरात जाऊन आजारी व्यक्तींची तपासणी करणार आहेत.
कोरोनाच्या नायनायटासाठी अमरावती सज्ज, 'डॉक्टर आपल्या परिसरात' उपक्रमाला सुरुवात
जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून हा उपक्रम राबविण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार, अमरावती शहरातील सर्व प्रभागात फिरत्या रुग्णालयाच्या माध्यमातून डॉक्टर परिसरात कोणी आजारी असेल तर त्याची तपासणी करणार आहेत. सुरुवातीला ही योजना शहरातील बफर झोनमध्ये राबवली जाणार आहे.
जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून हा उपक्रम राबविण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार, अमरावती शहरातील सर्व प्रभागात फिरत्या रुग्णालयाच्या माध्यमातून डॉक्टर परिसरात कोणी आजारी असेल तर त्याची तपासणी करणार आहेत. सुरुवातीला ही योजना शहरातील बफर झोनमध्ये राबवली जाणार आहे. त्यानंतर शहरातील प्रत्येक भागात जाऊन आरोग्य तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. नागरिकांनी या उपक्रमासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्यासह महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांनी केले आहे.