अमरावती- जिल्ह्याच्या अचलपूर नगरपालिकेमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत एकूण ५३१ घरकुल मंजूर होऊनही आतापर्यंत फक्त दहा घरकुलांचेच बांधकाम झाले आहे. उर्वरित सर्व घरकुलांचे तत्काळ बांधकाम करावे यासाठी मनसे आक्रमक झाली असून नगरपालिकेला निवेदन देण्यात आले आहे. त्वरीत घरकुल उपलब्ध न करून दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही मनसेने दिला आहे.
५३१ पैकी दहाच घरकुल का? अमरावतीत मनसे आक्रमक - अमरावती मनसे
जिल्ह्याच्या अचलपूर नगरपालिकेमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत एकूण ५३१ घरकुल मंजूर होऊनही आतापर्यंत फक्त दहा घरकुलांचेच बांधकाम झाले आहे. उर्वरित सर्व घरकुलांचे तत्काळ बांधकाम करावे यासाठी मनसे आक्रमक झाली असून नगरपालिकेला निवेदन देण्यात आले आहे.
अमरावतीत मनसे आक्रमक
हेही वाचा -अमरावतीमध्ये मतिमंद मुलीवर अत्याचार, आरोपी गजाआड
अमरावती जिल्ह्यातील अचलपूर नगरपालिकेंतर्गत जवळपास 531 घरकुलांचे बांधकाम मंजूर झालेले असताना आतापर्यंत केवळ दहा घरकुले तयार झाली असल्याची माहितीही मनसेला मिळाली. त्यामुळे मनसे पदाधिकारी व घरकुलापासून अद्यापही वंचित असलेल्या लाभार्थ्यांनी नगरपालिका कार्यालयावर धडक दिली.
Last Updated : Nov 28, 2019, 11:41 AM IST