महाराष्ट्र

maharashtra

आमदार यशोमती ठाकुरांचा धनगर समाजाने कोकरू देऊन केला सन्मान

By

Published : Oct 26, 2019, 4:41 PM IST

अमरावती जिल्ह्यातील तिवसा मतदारसंघाच्या नवनिर्वाचित आमदार यशोमती ठाकूर यांचा धनगर समाजाच्या वतीने 'कोकरू आणि काठी' देऊन सत्कार करण्यात आला.

आमदार यशोमती ठाकुरांचा धनगर समाजाने कोकरू देऊन केला सन्मान

अमरावती -जिल्ह्यातील तिवसा मतदारसंघातून विजयाची हॅट्रिक करणाऱ्या आमदार यशोमती ठाकूर यांचा धनगर समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी धनगर समाजाच्यावतीने ठाकूर यांना डोक्यावर फेटा बांधुन एक घोंगडी, काठी आणि छोटे कोकरू देण्यात आले.

आमदार यशोमती ठाकुरांचा धनगर समाजाने कोकरू देऊन केला सन्मान

हेही वाचा... अमरावतीत दिवाळीसाठी बाजारपेठ सजल्या, चिनी लायटिंगला लोकांची ना पसंती

धनगर बांधवांकडून येळकोट येळकोट जय मल्हार चा जयघोष

आमदार यशोमती ठाकूर यांचा सत्कार करताना धनगर बांधवांनी येळकोट येळकोट जय मल्हार चा जयघोष केला. आमदारांनीही हा सत्कार मोठ्या आनंदाने स्विकारला. यावेळी यशोमती ठाकूर यांच्या आई उपस्थित होत्या. तर सुरेखा ठाकरे, संतोष महात्मे यांच्यासह धनगर समाजाचे अनेक कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते. आमदार यशोमती ठाकुर यांनी मतदारांचे आभार मानले आणि गेल्या पाच वर्षात राहिलेली कामे लवकरात लवकर पूर्ण करून तिवसा मतदारसंघातील प्रत्येक नागरीकांना सर्व मूलभत सोई मिळण्याकडे लक्ष देणार असल्याचे म्हटले आहे.

हेही वाचा... अमरावती विधानसभा : बडनेरातून रवी राणा विजयी, तर कृषीमंत्री अनिल बोंडेंचा पराभव

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details