महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Yashomati Thakur Death Threat: तुमचाही दाभोलकर करण्याची ट्विटवरून धमकी, यशोमती ठाकूर म्हणाल्या... - महात्मा गांधींविरोधात अपमानजनक वक्तव्य

राजकीय नेत्यांना धमकीचे सत्र सुरूच आहे. आमदार यशोमती ठाकूर यांना आज ट्विटरवरून जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. त्यांनी संभाजी भिडे यांच्या वक्तव्याचा निषेध केल्यानंतर त्यांना ही धमकी मिळालेली आहे.

MLA Yashomati Thakur
आमदार यशोमती ठाकूर

By

Published : Jul 31, 2023, 1:24 PM IST

Updated : Jul 31, 2023, 3:04 PM IST

प्रतिक्रिया देताना आमदार यशोमती ठाकूर

अमरावती :अमरावती जिल्ह्याच्या माजी पालकमंत्री आणि आमदार यशोमती ठाकूर यांना तुमचाही दाभोलकर करू, अशा शब्दांत ट्विटरवरून जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. संभाजी भिडे यांनी महात्मा गांधींविरोधात अपमानजनक वक्तव्य केले. महात्मा फुले यांच्याबद्दलही गैरउद्गार काढले. यामुळे अशा हरामखोरांना धडा शिकवलाच पाहिजे. अशा शब्दात मी त्यांचा निषेध केला. त्यांचा निषेध करणे हे चुकीचे नव्हते, असे असताना देखील तुमचा दाभोलकर करू अशी धमकी मला मिळाली आहे. रविवारी पृथ्वीराज चव्हाण यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली होती, आज मला धमकी मिळाली आहे. या सर्व प्रकरणामागे सत्ताधारीच आहेत, असे यशोमती ठाकूर माध्यमांशा बोलताना म्हणाल्या आहेत. रविवारी सत्ताधाऱ्यांचा खासदार अनिल बोंडे त्यांच्यासोबत आंदोलनात का उतरला? असा सवाल देखील यशोमती ठाकूर यांनी केला आहे.

तर सत्ताधारीच जबाबदार :आम्हाला जीवे मारायची धमकी मिळाली आहे, त्यांनी आम्हाला जीवानिशी मारून टाकावे. मात्र, आम्ही या सर्व गोष्टींचा पर्दाफाश केल्याशिवाय राहणार नाही, असे आमदार यशोमती ठाकूर यांनी स्पष्ट केले आहे. महात्मा गांधी, पंडित नेहरू, महात्मा फुले यांच्याबाबत काही बोलाल, ते आम्ही सहन करायचे, हे कसे चालणार? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. उद्या माझ्या जीवाचे काही बरे वाईट झाले, तर त्यासाठी सत्ताधारीच जबाबदार असतील, असे देखील आमदार यशोमती ठाकूर यांनी म्हटले आहे.

पृथ्वीराज चव्हाण यांना जीवे मारण्याची धमकी :काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे रविवारी समोर आले आहे. त्यांन धमकीचा फोन आणि इमेल आलेला आहे. शुक्रवारी विधानसभेत त्यांनी श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थान संस्‍थेचे संस्‍थापक संभाजी भिडे यांनी महात्मा गांधींविरोधात केलेल्या अपमानास्पद वक्तव्यावरून त्यांना अटक करण्याची मागणी केली होती. त्यानंतर चव्हाण यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. आता यशोमती ठाकूर यांनाही धमकी प्राप्त झाली आहे. संभाजी भिडे यांचे मात्र महापुरूषांबद्दल अपमानास्पद वक्तव्य करण्याचे सत्र सुरूच आहे.

हेही वाचा :

  1. Devendra Fadnavis : महात्मा गांधींचा अपमान सहन करणार नाही; भिडेंविरुद्ध फडणवीसांचा कारवाईचा इशारा
  2. Sambhaji Bhide : भाजपात हिम्मत असेल तर सरकारी कार्यालयातील महात्मा गांधींचे फोटो....; महिला आमदाराचे थेट आव्हान
  3. Anil Bonde On Yashomati Thakur : 'भिडे गुरुजींचा अपमान केल्याप्रकरणी यशोमती ठाकूर यांच्यावर गुन्हा दाखल करा'
Last Updated : Jul 31, 2023, 3:04 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details