अमरावती- जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरणातील पाणी तिवसा विधानसभा मतदार संघातील गावांसाठी सोडण्याचा निर्णय अचानक रद्द केल्याने आज (सोमवार) आमदार यशोमती ठाकूर यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर ठिय्या देऊन भाजप सरकारचा निषेध नोंदवला.
अप्पर वर्धा धरणातील पाण्यासाठी आमदार यशोमती ठाकूर यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर ठिय्या
प्रशासनाने यावर तोडगा काढू असे आश्वासन देऊन आमदार ठाकूर यांना चर्चेसाठी बोलावले. जिल्हाधिकारी कार्यालयात आमदार ठाकूर कार्यकर्त्यांसह पोहचल्या असता बैठकीला वेळ आहे थोडे थांबा असे त्यांना सांगण्यात आले. यानंतर आमदार यशोमती ठाकूर आणि कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री, पंतप्रधान आणि भाजप सरकारविरोधात जोरदार घोषणा दिल्या.
जिल्ह्यात पाणी टंचाईने कहर केला असताना जिल्हा प्रशासनाने अप्पर वर्धा धरणातील पाणी तिवसा मतदारसंघात येणाऱ्या गावांसाठी सोडण्याचा निर्णय घेतला होता. रविवारी रात्री धरणाची दारे उघडणार होती मात्र, आमदार डॉ. अनील बोंडे यांनी धरणातील पाणी सोडण्यास विरोध केल्याने जिल्हा प्रशासनाने आपला निर्णय बदलवला. भाजप आमदारांच्या दबावात नागरिकांना पिण्यासाठी पाणी न देणाऱ्या प्रशासनाच्या भूमिकेविराधात चक्क धरणात जलसमाधी घेण्याचे आमदार यशोमती ठाकूर यांनी जाहीर केले होते.
प्रशासनाने यावर तोडगा काढू असे आश्वासन देऊन आमदार ठाकूर यांना चर्चेसाठी बोलावले. जिल्हाधिकारी कार्यालयात आमदार ठाकूर कार्यकर्त्यांसह पोहचल्या असता बैठकीला वेळ आहे थोडे थांबा असे त्यांना सांगण्यात आले. यानंतर आमदार यशोमती ठाकूर आणि कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री, पंतप्रधान आणि भाजप सरकारविरोधात जोरदार घोषणा दिल्या. आमदार डॉ. अनिल बोंडे यांचाही निषेध नोंदवता जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर ठिय्या दिला.