अमरावती -विदर्भाचा आणि संपूर्ण महाराष्ट्राचा विकास व्हावा यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कार्यक्षम व्हावे यासाठी त्यांनी हनुमान चालीसा पठण करावे, असे आवाहन आम्ही ( MLA Ravi Rana on Matoshri ) त्यांना केले होते. मात्र, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा त्यांना विसर पडल्याने त्यांनी हनुमान चालीसा पठण ( Ravi Rana on Hanuman Chalisa news Amravati ) केले नाही. यामुळेच आम्ही येणाऱ्या शनिवारी 'मातोश्री'ची वारी करून मुख्यमंत्र्यांना जागृत करण्यासाठी हनुमान चालीसा पठण करणार असल्याचे आमदार रवी राणा ( Ravi Rana news Amravati ) म्हणाले.
MLA Ravi Rana on Matoshri : शनिवारी 'मातोश्री'वर हनुमान चालीसा पठण करणार - आमदार रवी राणा - Ravi Rana news badnera
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कार्यक्षम व्हावे यासाठी त्यांनी हनुमान चालीसा पठण करावे, असे आवाहन आम्ही ( MLA Ravi Rana on Matoshri ) त्यांना केले होते. मात्र, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा त्यांना विसर पडल्याने त्यांनी हनुमान चालीसा पठण ( Ravi Rana on Hanuman Chalisa news Amravati ) केले नाही. यामुळेच आम्ही येणाऱ्या शनिवारी 'मातोश्री'ची वारी करून मुख्यमंत्र्यांना जागृत करण्यासाठी हनुमान चालीसा पठण करणार असल्याचे आमदार रवी राणा ( Ravi Rana news Amravati ) म्हणाले.
शुक्रवारी विदर्भ एक्सप्रेसने निघणार -शनिवारी मातोश्रीवर हनुमान चालीसा ( Ravi Rana news Badnera ) पठणासाठी आम्ही आमच्या कार्यकर्त्यांसह बडनेरा रेल्वे स्थानकावरून विदर्भ एक्सप्रेसने मुंबईसाठी निघणार आहोत. गेल्यावेळी शेतकऱ्यांच्या विषयासंदर्भात आम्ही मुंबईला जाणार होतो, मात्र पोलीस यंत्रणेचा दुरुपयोग करून आम्हाला त्यावेळी अडविण्यात आले होते. आता मात्र आम्ही मातोश्रीवर ( Ravi Rana talk on Matoshri over Hanuman Chalisa ) नक्कीच पोहचू. शिवसैनिकांनी आम्हाला विरोध करण्यापेक्षा बाळासाहेब ठाकरे यांचे स्मरण करून त्यांनी सुद्धा आमच्यासोबत मातोश्रीवर हनुमान चालीसा पठण करावे, असे आमदार रवी राणा म्हणाले.
मुख्यमंत्र्यांना जागृत करणे हाच उद्देश -महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतील, बेरोजगारीच्या समस्या सोडविण्यासाठी मुख्यमंत्री प्रयत्न करतील, यासाठी आम्ही गेली अडीच वर्ष वाट पाहिली. मात्र, मुख्यमंत्री मातोश्रीबाहेर निघतच नाहीत. यामुळेच आता हनुमान चालीसा पठाणाच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हिंदुत्वासंदर्भात जागृत करण्यासोबतच राज्यातील संकट परिस्थितीवर मात करण्यासाठी त्यांनी सक्षम पाऊल उचलायला हवेत. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी निर्णय क्षमता दाखवावी यासाठीच हनुमान चालीसा पठणाद्वारे त्यांना जागृत करणे हाच आमचा मातोश्रीवारीचा उद्देश असल्याचे आमदार रवी राणा यांनी स्पष्ट केले.