अमरावती:लव्ह जिहादची प्रकरणे मोठया प्रमाणात वाढत आहेत. या प्रकरणांना आळा घालण्यासाठी येत्या हिवाळी अधिवेशनात विधेयक (bill in upcoming winter session to curb love jihad) आणणार असल्याची माहिती आमदार प्रविण पोटे (MLA Praveen Pote) यांनी दिली. तसेच जिल्ह्यात वारंवार घडत असलेल्या लव जिहादच्या मुद्दयावर त्यांनी चिंता व्यक्त केली.
MLA Praveen Pote : लव्ह जिहादला आळा घालण्यासाठी विधेयक आणणार - आमदार प्रविण पोटे - love jihad matter
लव्ह जिहादची प्रकरणे मोठया प्रमाणात वाढत आहेत. या प्रकरणांना आळा घालण्यासाठी येत्या हिवाळी अधिवेशनात विधेयक (bill in upcoming winter session to curb love jihad) आणणार असल्याची माहिती आमरावतीचे आमदार प्रविण पोटे (MLA Praveen Pote) यांनी दिली.
जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात गेल्या काही दिवसांपासून लव्ह जिहाद ची प्रकरणे समोर येत आहेत. मेळघाट मध्ये सुध्दा अशी प्रकरणे घडल्याचे उदाहरणे आहेत. समाजाचा असमतोल बिघडवणारी ही सगळी प्रकरणे आहेत. त्यामुळे या प्रकरणांना आळा घालण्यासाठीच या अधिवेशनात हे विधेयक मांडणार असल्याची माहीती आमदार प्रविण पोटे यांनी दिली. तर खासदार बोंडे यांनी सुद्धा जिल्ह्यात वाढत्या लव्ह जिहाद प्रकरणी गंभीर चिंता व्यक्त केली होती.
खा. नवनीत राणा झाल्या होत्या आक्रमक :एका विशिष्ठ समुदायाच्या तरूणाने अमरावती येथील तरुणीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून पळवून नेल्याची तक्रार राजापेठ पोलीस स्टेशन मध्ये दाखल करण्यात आली होती. पोलिस कारवाई करत नसल्याच्या कारणावरून खासदार नवनीत राणा आक्रमक झाल्या होत्या. हे प्रकरण प्रचंड गाजलं होतं.