आमदार देवेंद्र भुयार यांनी स्वतः ट्रॅक्टर चालवून केली फवारणी - देवेंद्र भुयार
संपूर्ण जगात कोरोना विषाणूचा धोका निर्माण झाला आहे. महाराष्ट्रातही कोरोनाबाधितांचे रुग्ण सर्वाधिक मिळाले आहे.
आमदार देवेंद्र भुयार यांनी स्वतः ट्रॅक्टर चालवुन केली फवारणी
अमरावती- संपूर्ण जगात कोरोना विषाणूचा धोका निर्माण झाला आहे. महाराष्ट्रातही कोरोनाबाधितांचे रुग्ण सर्वाधिक मिळाले आहे. तर, संशयित रुग्णही वाढत आहे. अशा स्थितीत अमरावती जिल्ह्यातील वरुड मोर्शी मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी स्वतःच पुढाकार घेत सार्वजनिक ठिकाणी रस्ते निर्जंतुकीकरण करण्यासाठी चक्क गल्लोगल्ली ट्रॅक्टर चालून फवारणीची मोहीम हाती घेतली आहे. त्यांनी आधुनिक यंत्र आणुन मतदार संघात लक्ष ठेवून स्वतःच ट्रॅक्टर चालवुन फवारणी केली आहे.