महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आमदार बच्चू कडूंना 'त्या' घटनेप्रकरणी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश - Mumbai Police Latest News

प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांना अधिकाऱ्यांवर लॅपटॉप भिरकावल्या प्रकरणी मुंबई न्यायालयाने नोटीस बजावली आहे. त्यांना येत्या चार नोव्हेंबरला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

आमदार बच्चू कडुंना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

By

Published : Nov 2, 2019, 11:02 PM IST

Updated : Nov 3, 2019, 12:20 AM IST

अमरावती -प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी वर्षभरापूर्वी मुंबई मंत्रालयात महापरीक्षा पोर्टल बंद करण्याच्या मागणीसाठी अधिकाऱ्यावर लॅपटॉप भिरकावला होता. याप्रकरणी आमदार बच्चू कडूंच्या विरोधात मुबंईच्या मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात तक्रार करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता वर्षभरानंतर आमदार बच्चू कडू यांना मुंबई न्यायालयाने नोटीस बजावली आहे. त्यामुळे येणाऱ्या चार नोव्हेंबरला आमदार कडू यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे.

आमदार बच्चू कडुंना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

मंत्रालयात माहिती तंत्रज्ञान संचालक प्रदीप पी यांना आमदार बच्चू कडू यांनी लॅपटॉप फेकून मारण्याचा प्रयत्न केला होता. "स्पर्धा परीक्षा विद्यार्थी महामोर्चा" राज्य सरकारच्या स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी महापरीक्षा पोर्टल बंद करण्यात यावे, अशी मागणी बच्चू कडू यांनी केली होती. त्यामुळे बच्चू कडू यांच्या विरोधात २७/९/२०१९ ला कलम ३५३, १४७, ५०४, ५०६ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले होते. पोलिसांनी वर्षभरानंतर तपास झाल्याचे सांगत येत्या 4 नोव्हेंबरला मुंबई महानगर न्यायालयात हजर राहणाची नोटीस बजावली. याच दिवशी बच्चू कडू यांच्या विरोधात दोषारोपपत्र सादर करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आमदार बच्चू कडू यांच्या विरोधात हे जाणीवपूर्वक कारस्थान असल्याचे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे.

आमदार बच्चू कडूना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश
Last Updated : Nov 3, 2019, 12:20 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details