अमरावती : अचलपूरचे आमदार आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या वाहनाचा कठोरा नाका परिसरात अपघात झाला (MLA Bachu Kadu Accident ) आहे. त्यांचे वाहन रस्ता दुभाजकावर आढळून उलटले. हा अपघात आज सकाळी सव्वा सहाच्या सुमारास झाला. या अपघातात बच्चू कडू गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याचे कारण समोर येत आहे. त्यांची प्रकृती स्थिर ( Bachu Kadu Accident ) आहे.
डोक्याला चार टाके :आमदार बच्चू कडू हे चांदूरबाजारकडून अमरावतीला येत असताना कठोरा नाका परिसरात त्यांच्या ( Bachu Kadu Accident in Kadhara Naka area ) वाहनासमोर अचानक दुचाकी स्वार आल्यामुळे वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि बच्चू कडू यांची गाडी थेट दुभाजकावर जाऊन आदळली. आणि त्यानंतर उलटली. या अपघातात आमदार बच्चू कडू यांच्या डोक्याला आणि पायाला गंभीर इजा झाली. त्यांना तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात ( Bachu Kadu treated at private hospital ) आले. उपचारादरम्यान त्यांच्या डोक्याला चार टाके पडले ( Four stitches on Bachu Kadu head ) आहेत.