महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jan 4, 2020, 12:50 PM IST

ETV Bharat / state

पदापेक्षा काम महत्त्वाचे, बच्चू कडूंचा अब्दुल सत्तारांना सल्ला

राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्याबाबत राज्यमंत्री बच्चू कडू यांना विचारले असता, पदापेक्षा काम महत्त्वाचे आहे. त्यामुळे काम कसे करता येईल याकडे लक्ष द्यावे, असे ते म्हणाले.

MLA Bachhu kadu
राज्यमंत्री बच्चू कडू

अमरावती -राज्यात ३ पक्षांचे सरकार आहे. त्यामध्ये घटक पक्ष देखील आहेत. त्यामुळे पद कोणते मिळाले? याकडे लक्ष न देता काम कसे करता येईल याकडे अब्दुल सत्तार यांनी लक्ष द्यावे. त्यांनी राजीनामा दिला याबाबत अद्यापही स्पष्ट माहिती नाही. मात्र, त्यांची राजीनामा द्यायची इच्छा असेल तर त्यांनी घाई करू नये, असा सल्ला राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिला आहे.

पदापेक्षा काम महत्त्वाचे, बच्चू कडूंचा अब्दुल सत्तारांना सल्ला

दरम्यान, राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला असल्याची सूत्रांची माहिती आहे. अब्दुल सत्तारांनी राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती, तर कॅबिनेट मंत्रिपद न मिळाल्याने त्यांनी राजीनामा दिल्याची माहिती आहे. सत्तार शिवसेनेचे सिल्लोडचे आमदार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसची साथ सोडून अब्दुल सत्तार शिवसेनेत आले होते. सत्तार यांनी औरंगाबादमधील सिल्लोड मतदारसंघातून विधानसभा निवडणूक जिंकली. ठाकरे मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रिपदाची आशा असलेल्या सत्तार यांची राज्यमंत्रिपदावर बोळवण झाल्याने ते नाराज होते. अल्पसंख्याक समूहातून येऊन अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड मतदारसंघात आपला दबदबा निर्माण केला आहे. कोणत्याही एका जातीच्या जीवावर राजकारण करण्याऐवजी अब्दुल सत्तार यांनी सर्व जाती-धर्मात आपले समर्थक निर्माण करून आपले राजकीय वर्चस्व कायम राखले आहे. मात्र, आता महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये त्यांना राज्यमंत्री पद देण्यात आले आहे. त्यामुळे ते नाराज असल्याने त्यांनी राजीनामा दिल्याचे बोलले जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details