महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भाजपानं फक्त वापरुन घेण्याची भाषा करू नये; बच्चू कडूंचा इशारा - बच्चू कडूंचा भाजपाला ईशारा

MLA Bacchu Kadu : भाजपानं फक्त वापरून घेण्याची भाषा करू नये, असा इशारा आमदार बच्चू कडू यांनी भाजपाला दिलाय. भाजपा सध्या लोकसभा मतदारसंघनिहाय बैठका घेत आहे. या बैठकीकडं प्रहार जनशक्तीचे आमदार बच्चू कडू यांनी पाठ फिरवली आहे.

Bachchu Kadu
Bachchu Kadu

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 14, 2024, 6:09 PM IST

बच्चू कडूंचा भाजपाला इशारा

अमरावती MLA Bacchu Kadu : प्रहार जनशक्तीचे आमदार बच्चू कडू यांनी भाजपाला पुन्हा आव्हान दिलं आहे. लोकसभेच्या जागेबाबत महायुतीची अमरावतीत बैठक आहे. अमरावतीचे आमदार बच्चू कडू यांनी या बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचं जाहीर केलं आहे. संपूर्ण महाराष्ट्रात दोनशे ते तीनशे ग्रामपंचायतींवर आमचा झेंडा फडकला आहे. त्यामुळं महाराष्ट्रात आपलं महत्त्व आहे. भाजपाला जशी लोकसभा निवडणूक महत्त्वाची आहे, तशीच विधानसभा आमच्यासाठी महत्वाची असल्याचं आमदार बच्चू कडू यांनी म्हटलंय. आता आम्ही तटस्थ आहोत असं देखील त्यांनी म्हटलंय.

...अन्यथा गेम करू :महायुतीच्या अमरावती लोकसभेच्या बैठकीला आम्ही जाणार नाही. सध्या आमची भूमिका तटस्थ आहे. आम्ही वाट पाहत आहोत. भाजपाच्या डोक्यात विधानसभा आहे. त्यामुळं आमची भूमिका काय? वेळ आल्यावरच सांगू, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. आमच्या मतदारसंघाव्यतिरिक्त दोन नगर पंचायती प्रहारच्या असून आम्हाला निधी मिळालेला नाही, असंही बच्चू कडू म्हणाले. विधानपरिषदेबाबत भाजपा काय निर्णय घेणार? त्यांनी समोरासमोर बसून निर्णय घ्यावा, त्यानंतर तयारीला सुरुवात करू, असंही कडू म्हणाले. विधानसभेबाबत भाजपाचे चित्र स्पष्ट होईपर्यंत आम्ही तटस्थ राहू, अन्यथा गेम करू, असं आव्हानही आमदार बच्चू कडू यांनी भाजपाला दिलं आहे.

5 फेब्रुवारीला जाहीर करणार भूमिका :प्रहारचे कार्यकर्ते भाजपाच्या धोरणावर नाराज आहेत. जिल्ह्यात कुठल्याही समितीवर कार्यकर्त्याला महाराष्ट्रात कुठंही स्थान मिळालं नाही. कार्यकर्त्यांनी नाराजीचा सूर मला बोलून दाखवला आहे. कोणतंही काम करायचं ते कार्यकर्त्यांशिवाय होणं शक्य नाही. यामुळंच आम्ही 5 फेब्रुवारीला महाराष्ट्रातील आमच्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेऊ. त्यानंतर पुढच्या राजकीय वाटचाली संदर्भात भूमिका जाहीर करणार असल्याचे आमदार बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.

महायुतीच्या बैठकीत सहभाग नाही :लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमरावतीत संगीत सूर्य केशवराव भोसले सभागृहात महायुतीची बैठक होत आहे. या बैठकीत आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षासह भाजपा, शिवसेना (शिंदे गट) राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)च्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक होत आहे.

हेही वाचा -

  1. अखेर 'हात' सोडला! एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मिलिंद देवरांचा शिवसेनेत प्रवेश
  2. मिलिंद देवरांची पत्नी पूजा शेट्टीचं बॉलिवूडसोबत आहे अनोखं नातं; जाणून घ्या लव्हस्टोरी
  3. मिलिंद देवरांच्या राजीनाम्याबाबत काँग्रेसचा थेट पंतप्रधान मोदींवर आरोप, 'हा' केला मोठा दावा

ABOUT THE AUTHOR

...view details