महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अपंगांच्या मागण्यांसाठी बच्चू कडूंची दिल्लीत धडक; घेतला महाराष्ट्र सदनाचा ताबा - अपंग बांधव

अपंगाच्या विविध मागण्यासाठी प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी थेट दिल्लीत धडक दिली आहे. त्यांच्या नेतृत्वात अपंगानी महाराष्ट्र सदनाचा ताबा घेतला आहे.

अपंगांच्या मागण्यांसाठी बच्चू कडूंची दिल्लीत धडक

By

Published : Aug 9, 2019, 2:07 PM IST

Updated : Aug 9, 2019, 2:18 PM IST

अमरावती- प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी आता अपंगांच्या विविध मागण्यासाठी थेट दिल्लीत धडक दिली आहे. आज क्रांतीदिनी दिल्लीतील अतिमहत्त्वाचे ठिकाण असलेल्या महाराष्ट्र सदनाचा ताबा आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात अपंगांनी घेतला आहे.

प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू

सुरुवातीला दिल्लीच्या हिंदू महासभा भवनात 10 हजारच्यावर अपंग आंदोलक जमा झाले होते. मात्र, या ठिकाणी पोलीस आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे बच्चू कडू यांनी गनिमीकावा पद्धतीने महाराष्ट्र सदनाचा ताबा घेतला. या महाराष्ट्र सदनात हजारो अपंग बांधवांनी ठिय्या मांडला आहे. बच्चू कडू यांनी पुन्हा गनिमीकावा पद्धतीने आंदोलन केल्याने महाराष्ट्र सदनात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दिल्लीतील महाराष्ट्र सदन हे व्हीआयपी सदन आहे.

Last Updated : Aug 9, 2019, 2:18 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details