अमरावती -केंद्र शासनाच्या लोकविरोधी आणि कामगारविरोधी धोरणांचा निषेध म्हणून देशभरातील कामगार संघटनांनी भारत बंदची हाक दिली आहे. त्यानुसार आज (बुधवारी) बंद पाळण्यात येत आहे. अमरावती जिल्ह्यात भारत बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला असून ग्रामीण भागात सकाळपासून मोर्चे सुरू झाले आहेत.
अमरावती जिल्ह्यात भारत बंदला संमिश्र प्रतिसाद
अमरावती जिल्ह्यात भारत बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला असून ग्रामीण भागात सकाळपासून मोर्चे सुरू झाले आहेत. काही ठिकाणी केंद्र सरकार विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली आहेत.
बंदला संमिश्र प्रतिसाद
हेही वाचा - कामगार संघटनांचा देशव्यापी संप; मुंबईत शाळा, महाविद्यालयांसह वाहतूक सेवा सुरू
अमरावती शहर, तिवसा, वरुड, मोर्शी, मेळघाट, चांदूर रेल्वे येथे बंदला किरकोळ प्रतिसाद पाहायला मिळला. अंजनसिंगी येथे मात्र, सकाळपासून आंदोलनकर्ते रस्त्यावर आले आहेत. केंद्र सरकार विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. हे आंदोलन शांततेत सुरू असून कुठलाही अनुचित प्रकार घडल्याचे वृत्त नाही.