अमरावती -देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी काही आठवड्यामध्ये कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे आता राज्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणावर भर दिली जात आहे. शहरांमध्ये लसीकरण केंद्रांवर कोरोना प्रतिबंधक लस टोचून घेण्यासाठी लोकांची गर्दी पाहायला मिळत आहे. मात्र, आदिवासी बहुल भाग असलेल्या मेळघाटमधील चित्र जरा वेगळे आहे.
मेळघाटात आदिवासी बांधवांमध्ये शिक्षणाचा मोठ्या प्रमाणावर अभाव आहे. लसीकरणाबाबत त्यांच्यामध्ये विविध गैरसमज, अफवा, भीती आणि अंधश्रद्धा निर्माण झाली आहे. त्यामुळेच येथील अनेक गावातील आदिवासी बांधव हे लस टोचून घेण्यासाठी नकार देत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता मेळघाटात लसीकरण मोहीम वाढविण्यासाठी मेळघाटच्या प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी कंबर कसली आहे. त्या आता गावोगावी जाऊन कोरोनाविषयी जनजागृती व लसीकरणाचे महत्त्व आदिवासी बांधवांना त्यांच्याच कोरकू व आदिवासी भाषेत समजून सांगत आहे.
अमरावती जिल्ह्यात पहिल्या लाटेत मोठ्या प्रमाणावर कोरोनाने शिरकाव केला होता. मात्र, मेळघाटमध्ये कोरोनाने शिरकाव केलेला नव्हता. मात्र, होळी सणानंतर मोठ्या प्रमाणावर मेळघाटमध्येही कोरोनाचे रुग्ण आढळून आले. त्यामुळे अनेक गावे प्रतिबंध क्षेत्रे म्हणून घोषित करण्यात आली होती. मात्र, आता कोरोनाची लाट ओसरू लागल्याने लसीकरणावर ही मोठ्या प्रमाणावर भर दिला जात आहे. मेळघाटात लसीकरणाचीकडे लोक पाठ फिरवत असल्याचे दिसल्यानंतर प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्ह्याधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी काही कल्पक व्हिडिओ तयार करून ते सोशल माध्यमांवर वायरल केले. आदिवासी भागातील लोकाना सहज कळावे म्हणून कोरकू भाषेमध्ये लसीकरणाचे महत्त्व सांगितले जाते. तसेच लस का घ्यावी? त्याचे काय फायदे आहेत? हेदेखील व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्यात आले.
हेही वाचा -मेळघाटात कुठे पेरणी तर कुठे पेरणीपूर्वी मशागत सुरू
आदिवासी बांधवामधील गैरसमज -
आदिवासी बांधवांमध्ये लसीकरणाबाबत अनेक गैरसमज आहे. आरोग्य विभागाकडून करण्यात येणारे लसीकरण हे जीव घेण्यासाठी केल्या जात असल्याची भीती आदिवासी बांधवांंमध्ये आहे. तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांनी घेतलेली लस आणि आदिवासींना देणारी लस ही वेगळी आहे. सोबतच ही लस कोरोना मुक्तीसाठी नाहीतर कोरोना होण्यासाठी दिली जात असल्याचा गैरसमजही त्यांच्यामध्ये आहे.
'कोरोना हारतीवा मेळघाट जितोवा' सीरिअल सुरू -