अमरावती- प्रेम प्रकरणातून एका तरुणाने १७ वर्षीय तरुणीला भरदिवसा छोटी तलवार भोकसल्याची घटना घडली. त्यानंतर तरुणाने स्वतःच्या पोटावरही लहान तलवारीने वार केला. धामणगाव रेल्वे शहरातील एका बागेमध्ये ही घटना घडली. यामध्ये तरुणीचा जागीच मृत्यू झाला असून तरुण गंभीर जखमी झाला आहे. सागर तितुरमारे (रा.दत्तापूर), असे जखमी तरुणाचे नाव असून त्याच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्रेम प्रकरणातून तरुणाने छोटी तलवार भोकसून केली तरुणीची हत्या, स्वतःलाही संपवण्याचा प्रयत्न - छोट्या तलवारीने
प्रेम प्रकरणातून एका तरुणाने १७ वर्षीय तरुणीला भरदिवसा छोटी तलवार भोकसल्याची घटना घडली. त्यानंतर तरुणाने स्वतःच्या पोटावरही तलवारीने वार केले. धामणगाव रेल्वे शहरातील एका बागेमध्ये ही घटना घडली. यामध्ये तरुणीचा जागीच मृत्यू झाला असून तरुण गंभीर जखमी झाला आहे.
मुलगी ही जुना धामणगाव येथील रहिवासी असून ती धामणगावमधील एका महाविद्यालयात 12 वीत शिकत आहे. आज (दि. 6 जाने.) सव्वाअकरा वाजण्याच्या दरम्यान शाळेत जात असताना एका तरुणाने तिच्या पोटावर छोट्या तलवारीने वार केले, तर तरुणाने स्वतःच्या पोटावरही त्याच तलवारीने वार करून संपवन्याचा प्रयत्न केला. यामध्ये तरुणीचा मृत्यू झाला असून गंभीर जखमी झालेल्या तरुणावर उपचार सुरू आहेत. पोलीस सध्या घटनास्थळी पोहोचले असून तपास सुरू आहे.
हेही वाचा - मेळघाटातील कुपोषण मुक्तीसाठी प्रयत्न करणार - यशोमती ठाकूर