अमरावती -दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचाराच्या घटनांचे प्रमाण वाढतच आहे. यातच तिवसा तालुक्यातील मोझरी या गावात एका अल्पवयीन मुलीवर २० वर्षीय तरुणाने अत्याचार केल्याची घटना २६ डिसेंबरला उघडकीस आली. सध्या आरोपी फरार असून त्याचा तपास सुरू आहे.
पोलीस माहितीनुसार, ऋषिकेश वडस्कर (वय 20) रा. मोझरी या तरुणाने गावातील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. संबंधीत अल्पवयीन मुलगी नियमितपणे शाळेतून घरी परत जात असताना तिचा पाठलाग करत रस्त्यात कोणी नसल्याचे पाहून मुलाने तिला बळजबरीने दुचाकीवर बसून स्वतःच्या घरी नेले व अत्याचार केला. त्यानंतर घाबरलेल्या मुलीने बदनामीच्या भीतीने उंदीर मारायचे औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.