अमरावती- एका अल्पवयीन मुलीवर बाप, भाऊ व काका (मावशीचा नवरा) यांच्याकडून बलात्कार झाल्याचा अतिशय संतापजनक प्रकार समोर आला आहे. अमरावतीच्या चांदूर बाजार पोलीस ठाण्यांतर्गत ही घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी नराधम पित्याला व भावाला अटक केली आहे.
पीडित मुलीच्या आईचा कर्करोगाने वर्षभरापूर्वी मृत्यू झाला होता. त्यानंतर घरात पीडित तरुणी तिचा भाऊ आणि वडिलांसोबत राहत होती. पत्नीच्या मृत्यूनंतर विकृत असलेल्या बापाने नात्याला काळिमा फासणारे कृत्य सुरू केले. सतत एक वर्ष त्याने पोटच्या मुलीवरच अत्याचार केला. कोठे वाच्यता केली, तर ठार मारण्याच्या धमक्याही दिल्या. पीडिता धाडस दाखवत घरातून मावशीकडे निघून गेली. सर्व प्रकार मावशी व काकाला (मावशीचा नवरा) सांगितला. मात्र, तिला मदत करण्याऐवजी 70 वर्षीय काकानेही तिच्यावर अत्याचार केला. मुलीने याबाबातही मावशीला सांगितले. मात्र, तुला राहायचे असेल तर सर्व सहन करावेच लागेल, असे ती म्हणाली.
हेही वाचा - 'या' पोलीस निरीक्षकाला राष्ट्रपती पोलीस पदक, पुरात अडकलेल्या 12 जणांना जीवदान देण्यात मोठा वाटा