अमरावती- पालकमंत्री व राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांची बैलगाडीतून मिरवणूक काढून आगळे वेगळे स्वागत करण्यात आले. यावेळी ठाकूर यांनी बैलगाडीचे दोर आपल्या हातात घेत बैलगाडी हाकली.
बैलगाडीतून मिरवणूक काढून मंत्री यशोमती ठाकूर यांचे स्वागत - अमरावती
यशोमती ठाकूर या संपूर्ण ग्रामीण असलेल्या तिवसा मतदारसंघाचे नेतृत्व करत आहे. काल (शनिवारी) मंत्री यशोमती ठाकूर यांनी अमरावती तालुक्यातील नांदुरा लष्करपूर येथे भेट दिली. तेव्हा गावकऱ्यांनी चक्क बैलगाडीतून ठाकूर यांची मिरवणूक काढली व त्यांचे स्वागत केले.
![बैलगाडीतून मिरवणूक काढून मंत्री यशोमती ठाकूर यांचे स्वागत yashomati thakur](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6171814-thumbnail-3x2-op.jpg)
यशोमती ठाकूर या संपूर्ण ग्रामीण असलेल्या तिवसा मतदारसंघाचे नेतृत्व करत आहे. काल मंत्री यशोमती ठाकूर यांनी अमरावती तालुक्यातील नांदुरा लष्करपूर येथे भेट दिली. तेव्हा गावकऱ्यांनी चक्क बैलगाडीतून ठाकूर यांची मिरवणूक काढली व त्यांचे स्वागत केले. यशोमती ठाकूर यांनी स्वतः आपल्या हातात बैलगाडीचा दोर घेऊन बैलगाडीसुद्धा चालवली. वाजत गाजत मंत्र्यांची बैलबंडीतून निघालेली ही मिरवणूक जिल्ह्यात चर्चेचा विषय बनली आहे.
हेही वाचा-अमरावतीच्या भातकुली तालुक्यात 80 वर्षीय वृद्धाची डोक्यात लोखंडी रॉड मारून हत्या