अमरावती - देशात सुरू असलेल्या कोरोनाच्या महामारी आडून केंद्र सरकारचा मोठे राजकारण करण्याचा डाव असून केंद्र सरकार मुंबई व महाराष्ट्र राज्याला दुजाभावाची वागणूक देत असल्याचा गंभीर आरोप राज्याच्या महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी केला आहे. सोबतच आर्थिक भांडवल हे गुजरातला हलवण्याचा प्रयत्नदेखील सुरू असल्याचा आरोप मंत्री यशोमती ठाकूर यांनी केला आहे.
'कोरोनाच्या आडून केंद्र सरकारचा मोठे राजकारण करण्याचा डाव' - yashomati thakur on corona
कोरोना महामारीच्या आड केंद्र सरकारचा मोठे राजकारण करण्याचा डाव आहे. गुजरातमध्ये हायटेक सीटी बनवण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे, असेही त्या म्हणाल्या. मुंबईमधील सर्व कार्पोरेट कंपन्या या हळूहळू गुजरातला हलवण्याचा हेतू हा केंद्र सरकारचा आहे.

केंद्र सरकार हे जाणीवपूर्वक मुंबई व महाराष्ट्राकडे दुर्लक्ष करीत आहे. देशाचा सर्वाधिक जीडीपी हा मुंबईमधून जातो. त्यामुळे कोरोनाच्या महामारीत मुंबईला विशेष पॅकेज द्यायला काय हरकत आहे. देशातील सर्वाधिक खासगी बँका आणि कॉर्पोरेट कार्यालये हे मुंबईत आहेत. मुंबई हे महाराष्ट्रच नव्हे तर देशाचे आर्थिक भांडवल आहे, असे ठाकूर म्हणाल्या.
कोरोना महामारीच्या आड केंद्र सरकारचा मोठे राजकारण करण्याचा डाव आहे. गुजरातमध्ये हायटेक सीटी बनवण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे, असेही त्या म्हणाल्या. मुंबईमधील सर्व कार्पोरेट कंपन्या या हळूहळू गुजरातला हलवण्याचा हेतू हा केंद्र सरकारचा आहे. केंद्र सरकारकडून महाराष्ट्र सरकारला मिळत असलेली दुजाभावाची वागणूक बंद केली पाहिजे आणि मुंबईसाठी विशेष पॅकेजची घोषणा करून केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या पाठीशी राहावे असेही यशोमती ठाकूर म्हणाल्या.