अमरावती -केंद्र सरकारच्या योजना, केंद्र सरकारने केलेले कामे हे जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी भाजपकडून राज्यभर जन आशीर्वाद यात्रा काढण्यात येत आहे. आज केंद्रीय मंत्री डॉ भागवत कराड, नारायण राणे, डॉ. भारती पवार आणि डॉ. कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली विविध ठिकाणाहून या यात्रेला सुरुवात झाली आहे. भाजपचे चार नवनिर्वाचित केंद्रीय मंत्री हे संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. दरम्यान, भाजपच्या या जनआशीर्वाद यात्रेवर मंत्री यशोमती ठाकूर यांनी जोरदार टीका केली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत केंद्र सरकारची झालेली नामुष्की आणि बदनामी हे सावरण्यासाठी हे सर्व भाजपचे थोतांड असल्याची टीका मंत्री यशोमती ठाकूर यांनी केली आहे.
कोरोनामुळे देशातील बिकट स्थितीला केवळ प्रधानमंत्री जबाबदार
कोरोनामुळे देशातील बिकट स्थितीला केवळ पंतप्रधान मोदी हेच कारणीभूत आहेत. हॅलो ट्रम हा कार्यक्रम त्यांनी घेतला नसता तर कोरोना इतका वाढला नसता. स्वतःवर येऊ नये म्हणून त्यांनी हे सर्व मरकजवर टाकलं आणि त्यातून देशात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला, असा आरोपही मंत्री ठाकूर यांनी केला.
गंगेतील प्रेतामूळे आपला देश ओळखला जातो