महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

म्हणजे तुम्ही दुधाने धुतल्या आहेत का? पाणी प्रश्नावरून यशोमती ठाकुरांनी महिला अधिकाऱ्याला झापलं

जिल्ह्यातील तिवसा शहरात मागील काही दिवसांपासून डेंग्यूने कहर केला आहे. ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. तर दुसरीकडे पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. नळाद्वारे येणारे पाणीही अतिशय गढूळ असल्याची माहिती मंत्री यशोमती ठाकूर यांना मिळाली होती.

yashomati thakur
यशोमती ठाकूर

By

Published : Aug 1, 2021, 9:35 AM IST

अमरावती - तिवसा शहरातील डेंग्यू परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी एका महिला मुख्याधिकाऱ्याला झापले.

आढावा बैठक -

जिल्ह्यातील तिवसा शहरात मागील काही दिवसांपासून डेंग्यूने कहर केला आहे. ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. तर दुसरीकडे पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. नळाद्वारे येणारे पाणीही अतिशय गढूळ असल्याची माहिती मंत्री यशोमती ठाकूर यांना मिळाली होती. त्याच पार्श्वभूमीवर ठाकूर यांनी शनिवारी सायंकाळी तिवसा नगरपंचायतमध्ये शनिवारी आढावा बैठक घेतली. या आढावा बैठकीदरम्यान नगरपंचायत प्रशासनाच्या कारभारावरुन महिला अधिकाऱ्याला झापले.

दरम्यान, काही महिलांनी गढूळ पाणी घेऊन तिवसा नगरपंचायतवर धडकही दिली. या वेळी संतप्त मंत्री ठाकूर यांनी नगरपंचायतीच्या महिला मुख्याधिकारी यांना तुफान झापले. गरज नसताना नगरपंचायतीच्या इमारतीला वॉल कंपाउंड केले. मात्र, पाण्याचा प्रश्न का सोडवला नाही. ही जनता गढूळ पाणी पिते. मग आता तुम्ही आता हे गडूळ पाणी पिऊन दाखवता का? असा सवाल त्यांनी यावेळी केला. तसेच महिलांनी आणलेल्या गढुळ पाण्याची बॉटलच महिला अधिकाऱ्यासमोर ठेवली. मंत्री ठाकूर यांच्या प्रश्नाला मुख्याधिकारी यांनी उत्तर दिल्यावर त्या आणखीनच संतापल्या. तुम्ही दुधाने धुतल्या आहेत का? या शब्दात त्यांची जीभ घरसली. अस मंत्री ठाकूर म्हणाल्या.

हेही वाचा -लैंगिक अत्याचार प्रकरण : 'गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य महिलांच्या मानवी हक्कांचं उल्लंघन करणारं'

अन् लोकांनी मला मारायचं का?

नाही त्या कामासाठी 72 लाख रूपये खर्च केले. त्या पैशात जलशुद्धीकरण झालं का नाही? तुमचीही काही जबाबदारी नाही का? तुम्ही बेजबाबदारी करायची आणि लोकांनी मला मारायचं का? असा सवाल मंत्री ठाकूर यांनी उपस्थित केला.

ABOUT THE AUTHOR

...view details