अमरावती -मागील काही दिवसांपासून पंजाब, हरयाणा, राजस्थान आदी राज्यातील हजारो शेतकरी हे केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करीत आहेत. दरम्यान या शेतकऱ्यांना कृषी कायद्याला विरोधच करायचा आहे तर त्यांनी दुसरीकडे जाऊन मरावे, असे बेताल वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री रतनलाल कटारीया यांनी केले आहे. त्यांच्या या बेताल वक्तव्याचा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी समाचार घेतला असून कटारियांनी तत्काळ या शेतकऱ्यांची माफी मागावी अन्यथा त्यांचे तोंड काळे केल्याशिवाय आम्ही राहणार नाही, असा इशारा कडू यांनी दिला आहे.
'तर मग तुम्हाला मारण्यासाठी यायचे का?'
बच्चू कडू म्हणाले, की रतनलाल कटारिया हे केंद्रीय राज्यमंत्री आहेत. त्यांनी शेतकऱ्यांबाबत हे वक्तव्य करणे चुकीचे आहे. तुम्ही जर शेतकऱ्यांसाठी मरणाची भाषा वापरत असाल तर मग आम्ही तुम्हाला मारण्यासाठी यायचे का, असा सवाल कडू यांनी केला आहे.