अमरावती - राज्यमंत्री बच्चू कडू हे सातत्याने विविध कारणासाठी चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहेत. बच्चू कडू यांनी कबड्डीच्या मैदानात एन्ट्री केल्याचे समोर आले आहे. अमरावतीच्या चांदुर बाजारमध्ये गो.सी. टोम्पे महाविद्यालयात तीन दिवसीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन केल्यानंतर बच्चू कडू यांनी स्वतः मैदान उतरून कबड्डी खेळाचा आनंद घेतला.
आमदार होण्यापूर्वी बच्चू कडू यांचा त्यांच्या बेलोरा गावात कबड्डी खेळाचा संघ होता. त्यांना असलेला कबड्डी खेळाचा छंद ते आजही जपतात. अशाच प्रकारे चांदुर बाजारमधील एका महाविद्यालयात कबड्डी सामन्याच्या उद्घाटनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आलेल्या बच्चू कडू यांनी खेळाडी भूमीका पार पाडली.