अमरावती - भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी काही दिवसांपूर्वी शनिशिंगणापूरला जाऊन शनिदेवाचे दर्शन घेतले होते. त्यानंतर आता दोन दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा शनिदेवाचे दर्शन घेऊन पूजा केली होती. भाजपच्या या दोन्ही नेत्यांच्या शनी दर्शनावरून राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि मंत्री बच्चू कडू यांनी निशाणा साधला आहे.
आव्हाड म्हणतात ते दोघेच एकमेकांचे शनि; तर शनिदेवालाच 'यांचा' शनि लागायचा बच्चू कडूंचा टोला - फडणवीस शनिदेवाच्या दर्शनाला
जितेंद्र आव्हाड म्हणाले, एकनाथ खडसे आणि फडणवीस हेच एकमेकांना आपला शनी समजतात. तर बच्चू कडू यांनी मंदिरात जाऊन कुणाचा शनी दूर होत नसतो, त्यांनी गाडगे बाबा वाचले नसतील किंवा तुकडोजी महाराजांच्या विचारांचा अभ्यास केला नसेल, उलट यांच्या दर्शनामुळे शनिदेवलाच शनी लागू नये म्हणजे झाले, असा उपरोधिक टोला लगावला आहे.
जितेंद्र आव्हाड म्हणाले, एकनाथ खडसे आणि फडणवीस हेच एकमेकांना आपला शनी समजतात. तर बच्चू कडू यांनी मंदिरात जाऊन कुणाचा शनी दूर होत नसतो, त्यांनी गाडगे बाबा वाचले नसतील किंवा तुकडोजी महाराजांच्या विचारांचा अभ्यास केला नसेल, उलट यांच्या दर्शनामुळे शनिदेवलाच शनी लागला नाही म्हणजे झाले, असा उपरोधीक टोला लगावला आहे.
भूखंड घोटाळ्याच्या आरोपानंतर मंत्रीपद गेल्यापासून एकनाथ खडसे हे वारंवार फडणवीसांसह भाजप नेत्यावर टीका करत होते. पुढे खडसेंचे या विधानसभा निवडणुकीत तिकीट कापल्यामागे फडणवीसांचा हात असल्याचे अप्रत्यक्षपणे खडसे यांनी बोलूनही दाखवले होते. त्यामुळे या दोघांचा वाद राज्याला माहिती आहे. त्यातच या दोन्ही नेत्यांनी शनिशिंगणापूरला जाऊन शनिदेवाचे दर्शन घेतले. यावरूनच आव्हाड आणि बच्चू कडू यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.