अमरावती - जिल्ह्यातील नांदगाव पेठ एमआयडीसीमधील रतन इंडियामध्ये असणाऱ्या सहाय्यक कंपन्यांनी मनमानी सुरू केली आहे. परप्रांतीय कामगारांना तुपाशी आणि मराठी कामगारांना उपाशी ठेवण्याचा प्रकार एमबीपीएल आणि पॉवर मॅक या कंपनीने केला होता. मराठी कामगारांच्या हक्कासाठी आवाज उठवणाऱ्या चार कामगारांचे कर्नाटकमध्ये स्थानांतर केल्याने कामगारांनी आंदोलन केले होते. या कामगारांच्या पाठिशी माध्यम म्हणून सुरूवातीपासून ईटीव्ही भारतने पाठपुरावा केला होता. मात्र, आज कामगार राज्यमंत्री बच्चू कडू यांनी कंपनी व्यवस्थापकासोबत बैठक घेतली. एकाही कर्मचाऱ्यांचे वेतन कपात होणार नाही, तर कोणाचेही स्थलांतर होणार नाही, असे आश्वासन कामगार राज्यमंत्री बच्चू कडू यांनी कामगारांना दिले.
रतन इंडियाच्या कामगारांवर अन्याय होणार नाही - राज्यमंत्री बच्चू कडू - अमरावती रतन इंडीया कंपनी न्यूज
कामगार राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आज रतन इंडियाच्या कंपनी व्यवस्थापकासोबत बैठक घेतली. एकाही कर्मचाऱ्यांचे वेतन कपात होणार नाही, तर कोणाचेही स्थलांतर होणार नाही, असे आश्वासन कामगार राज्यमंत्री बच्चू कडू यांनी कामगारांना दिले.

लॉकडाऊनमुळे मार्च महिन्यापासून आठवड्यातून केवळ दोन ते तीन वेळा कामगारांना कामावर बोलावण्यात येत असून, दहा हजारंऐवजी केवळ दोन हजार किंवा त्यापेक्षा कमी वेतन देण्यात येत होते. वेतन मागितले तर कामावरून कमी करण्याचा धमक्या कामगारांना देण्यात आल्या. मराठी कामगारांची बाजू घेणाऱ्या चार कामगारांचे स्थानांतरन कर्नाटक येथे केल्याने कामगारांनी आंदोलने व उपोषण केले होते. त्यामुळे आज कामगार राज्यमंत्री बच्चू कडू यांनी रतन इंडिया कंपनीचे उपाध्यक्ष कर्नल लोकेशसिंह व कामगारांची बैठक घेतली. यात तोडगा काढला त्यामुळे बऱ्याच आंदोलनानंतर कामगारांना न्याय मिळाला.