अमरावती -लॉकडाऊनमूळे राज्य सरकारची अर्थव्यवस्था ही कोलमडत असल्याने राज्याच्या 'अ' आणि 'ब' दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या पगारात 50 टक्के कपात करण्यात आली आहे. तर 'क' दर्जाच्या कर्मचाऱ्यांच्या पगारात 25 टक्के कपात करण्यात आली आहे. हा निर्णय सरकारने आज घेतला. दरम्यान, आरोग्य आणि पोलीस कर्मचारी यांच्या पगारात कुठलीही कपात करू नये, तसेच लॉकडाऊनमुळे नुकसान झालेल्या शेतकरी, मजूर आणि छोटे व्यावसायिक यांच्या बाबतीतही सरकारने तत्काळ निर्णय घ्यावा, अशी मागणी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केली आहे.
''पोलिसांसह आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात करू नये" - AMRAVATI CORONA EFFECT
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या देशभर लॉकडाऊन असल्याने राज्य सरकारच्या तिजोरीत येणारा महसूल हा बंद झाला आहे. त्यामुळे राज्य सरकारने कामगार कपातीच निर्णय घेतला. ही घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या देशभर लॉकडाऊन असल्याने राज्य सरकारच्या तिजोरीत येणारा महसूल हा बंद झाला आहे. त्यामुळे राज्य सरकारने कामगार कपातीच निर्णय घेतला. ही घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. दरम्यान, लॉकडाऊनच्या परिस्थितीत काम करणारे आरोग्य आणि पोलीस कर्मचारी यांच्या पगारात कुठलीही कपात करू नये, अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे.
दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी जसा निर्णय घेतला तसाच निर्णय पोल्ट्रीधारक, संत्रा, द्राक्ष, आंबा, टरबूज उत्पादक शेतकरी यांच्या उन्हाळी पिकांचे नुकसान लॉकडाऊनमुळे झाले आहे. यांच्यासाठी सरकारने कुठलाच निर्णय घेतला नसून, त्यांच्यासाठी तत्काळ निर्णय घ्यावा, यासह इतर समाजाच्या लोकांसाठीही मदतीचा निर्णय घेण्याची मागणी कडू यांनी केली आहे.