अमरावती - शनिवारी व रविवारी मध्यरात्री अमरावती जिल्ह्यातील मोर्शी, चांदुरबाजार तालुक्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्यमंत्री बच्चू कडू आज (रविवारी) थेट शेताच्या बांधावर पोहचले. यावेळी त्यांनी घटनास्थळी तलाठी, कृषिअधिकारी, कृषी मंडळ अधिकारी यांना बोलावून नुकसान झालेल्या पिकाचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले. शिवाय पंचनाम्याचा प्रस्ताव पाठविण्याचे आदेश देत व तत्काळ पूर्ण नुकसान भरपाईचेही आदेश कडू यांनी दिले.
Heavy Rain Amravati : ...अन् शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचले मंत्री बच्चू कडू - अनेक गावांची मंत्री बच्चू कडूनी केली पाहणी
बच्चू कडू यांनी राजुरा, अडगाव, बेलोरा याठिकाणी दौरा करून शेतकऱ्यांची भेट घेत नुकसानीची पाहणी केली. अमरावती जिल्ह्यात झालेल्या वादळी वारा, अवकाळी पाऊस आणि गारपीटमुळे कापूस, तूर, गहू, हरभरा, संत्रा आणि भाजीपाल्याचे प्रचंड नुकसान झाले आहे.
बच्चू कडू यांनी राजुरा, अडगाव, बेलोरा याठिकाणी दौरा करून शेतकऱ्यांची भेट घेत नुकसानीची पाहणी केली. अमरावती जिल्ह्यात झालेल्या वादळी वारा, अवकाळी पाऊस आणि गारपीटमुळे कापूस, तूर, गहू, हरभरा, संत्रा आणि भाजीपाल्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसामुळे हिसकावल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. आधीच खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या कापूस आणि सोयाबीन पिकाचे प्रचंड नुकसान झाल होत. त्यात पुन्हा आता अवकाळी पाऊस बरसल्याने बळीराजा संकटात सापडला आहे.