अमरावती - राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीसाठी मदत म्हणून नुकसानग्रस्त १० हजार कोटी रुपयांचे (शेतकऱ्यांसाठी साडे पाच हजार कोटी) पॅकेज जाहीर केले. ही रक्कम शेतकऱ्यांना दिवाळीच्या आधीच मिळणार असल्याचे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी अमरावतीत प्रतिक्रिया देताना सांगितले. मात्र, शेतकऱ्यांच्या मदतीवरून सध्या राज्याचे राजकारण तापले आहे. शेतकऱ्यांसाठी दिली जाणारी मदत ही तुटपुंजी असल्याचे वक्तव्य माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यांनी केले होते. यावर अनिल बोंडे यांनी केलेल्या वक्तव्याला राज्यमंत्री बच्चू कडू यांनी प्रत्युत्तर दिले.
शेतकऱ्यांसाठीच्या पॅकेजवरून बच्चू कडूंंचा माजी कृषीमत्र्यांवर पलटवार - मंत्री बच्चू कडू
अतिवृष्टीने नुकसान झाल्यानंतर राज्य सरकारने १० हजार कोटीचे मदतीचे पॅकेज घोषित केले आहे. त्यावरून ही मदत तुटपुंजी असल्याची टीका माजी कृषीमंत्री अनिल बोंडे यांनी केली होती. त्याला बच्चू कडू यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
बच्चू कडूंंचा माजी कृषीमत्र्यांवर पलटवार
दिवाळीला मिळणार का मदत-
माजी कृषी मंत्र्यांवर टीका करताना बच्चू कडू यांनी अतिवृष्टीने झालेल्या नुकसानी पोटी मिळणारी मदत दिवाळी पूर्वी मिळणार असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, खरेच दिवाळीपूर्वी ही मदत मिळणार का? काही शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे अद्यापही झाले नाहीत. त्यामुळे शेतकरी मिळणाऱ्या मदतीबाबत संभ्रमात आहेत.
Last Updated : Nov 2, 2020, 3:13 PM IST