अमरावती - केंद्र सरकारने खरीप हंगामाच्या पिकांच्या हमीभावात ५० ते ६२ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे, असा दावा भाजपच्या वतीने करण्यात आला आहे. यावर राज्यमंत्री बच्चू कडूंनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या भावाचा निषेध -
ते म्हणाले, 50 टक्के नफा धरून भाव काढले, असे ते म्हणतात. मात्र, ती फसवेगिरी आहे. आपण जर राज्य सरकारने केलेल्या शिफारस केलेली शिफारस केंद्राला जाहीर केलेले भाव त्याची जर तफावत पाहिली तर किमान एका क्विंटल मागे मोठी तफावत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने जाहीर केलेले या भावाचा आम्ही निषेध करतो, असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे.