अमरावती - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन झाल्यानंतर एक महिना उलटला आहे. मात्र, राज्यातील मजुरांचे स्थलांतर अद्याप थांबलेले नाही. उत्तर प्रदेशातून अमरावतीत कामाच्या शोधात आलेल्या 15 ते 20 मजूर तरुणांनी भर उन्हात आपल्या गावाची वाट धरली आहे. ते 1100 किलोमीटरचे अंतर पायी कापणार आहेत.
व्यथा कामगारांची...भूकेने मरण्यापेक्षा 1100 किलोमीटर पायी चालण्याचा निर्धार - lockdown in amravati
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन लागू झाल्यानंतर एक महिना उलटला आहे. मात्र, राज्यातील मजुरांचे स्थलांतर अद्याप थांबलेले नाही. उत्तर प्रदेशातून अमरावतीत कामाच्या शोधात आलेल्या 15 ते 20 मजूर तरुणांनी भर उन्हात आपल्या गावाची वाट धरली आहे.
विविध राज्यांतून शेकडो मजूर अमरावतीत पोटाची खळगी भरण्यासाठी दाखल होत असतात. परंतु, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने लॉकडाऊनमुळे काम बंद आहे. त्यात कंत्राटदाराने दुर्लक्ष केल्याने कामगारांची उपासमार होत आहे. अखेर या मजुरांनी गावी पायी जाण्याचा निर्णय घेतला असून कडक उन्हात 1100 किलोमीटर पायी प्रवास करण्याचा निर्धार केला.
जिल्ह्यात आतापर्यंत १० च्यावर कोरोनो बाधित आढळले असून दोघांचा मृत्यू झाला आहे. या दोन्ही महिला 20 एप्रिलला दगावल्या आहेत. कोरोना चाचणी अहवालात ज्या दोन महिला कोरोनाग्रस्त असल्याचे समोर आले, त्यापैकी एक 70 वर्षीय महिला कमेला ग्राऊंड परिसरातील असून दुसरी 60 वर्षीय महिला हैदरपुरा भागात वास्तव्यास आहे. या दोघींचाही 20 एप्रिलला मृत्यू झाला. यापैकी एकीचा खासगी रुग्णालयात तर दुसऱ्या महिलेचा घरातच मृत्यू झाला आहे.