महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राजस्थानातून हैदराबादला जाणारा मजूर मेळघाटातील डोहात बुडाला - स्थलांतरित मजूर मेळघाटातील डोहात बुडाला

धारणीपासून 50 किमी अंतरावरील सेमाडोह येथे 1 जून रोजी हैदराबादकडे जाणारे 8 मजूर जेवणासाठी थांबलेले होते. राजुराम पुनाराम जाट मित्रांसोबत होता. सिपना नदीच्या जवाहर कुंडातील पाणी पाहून आंघोळ करण्याचा मोह राजुरामला आवरता आला नाही. डोहाच्या खोलीची माहिती राजुरामला नव्हती. तो धाडकन पाण्यात उतरला. तो परत पाण्यावर आलाच नाही.

राजस्थानातून हैदराबादला जाणारा मजूर मेळघाटातील डोहात बुडाला
राजस्थानातून हैदराबादला जाणारा मजूर मेळघाटातील डोहात बुडाला

By

Published : Jun 3, 2020, 8:53 AM IST

अमरावती - मेळघाटातील सेमाडोहचे पर्यटनस्थळ असलेल्या जवाहर कुंडच्या डोहातून मंगळवारी राजुराम जाट नावाच्या युवकाचा मृतदेह सापडल्याने खळबळ माजलेली आहे. राजस्थान येथून धारणीमार्गे हैदराबादला जातांना मजुरांचा एक जत्था सेमाडोहात जेवणासाठी थांबला असता राजुराम आंघोळीसाठी डोहात उतरताच डोहात बुडल्याने परिसरात खळबळ उडाली.

धारणीपासून 50 किमी अंतरावरील सेमाडोह येथे 1 जून रोजी हैदराबादकडे जाणारे 8 मजूर जेवणासाठी थांबलेले होते. राजुराम पुनाराम जाट (वय 24, रा. गोडीकल्ला, जि. नागौर, राजस्थान) हा आपल्या मित्रांसोबत होता. सिपना नदीच्या जवाहर कुंडातील पाणी पाहून आंघोळ करण्याचा मोह राजुरामला आवरता आला नाही. डोहाच्या खोलीची माहिती राजुरामला नव्हती. तो धाडकन पाण्यात उतरला तो परत पाण्यावर आलाच नाही. मृताचा मित्र श्यामसुंदर देशराज जाट (वय 24) याने चिखलदरा पोलिसांना माहिती दिली. चिखलदराचे ठाणेदार आकाश शिंदे यांनी तत्काळ सेमाडोह चौकीतील पोलिसांना माहिती देऊन मृतदेह शोधण्याची मोहीम हाती घेतली. मंगळवारी सकाळी सिपनाच्या डोहातून राजुरामचा मृतदेह काढण्यात आला.

शवविच्छेदनानंतर मृतदेह श्यामसुंदर जाटच्या सुपूर्द करण्यात आला. या प्रकरणी सेमाडोहचे गोलू मुंडे व भोला मावस्कर यांनी मजुरांना व पोलिसांना सहकार्य केले. पुढील तपास ठाणेदार शिंदे यांच्या मार्गदर्शनात दिनेश तायडे व प्रशांत तातेड करीत आहेत. राजस्थानचे विष्णुकुमार जाट, धानाराम, खुशाल, प्रकाश व रणवीर हे हैदराबादला जाताना येथे थांबले असता ही घटना घडली. यापूर्वीही अनेक वेळा जवाहर कुंडच्या डोहात अनेक पर्यटक बुडून मेलेले आहे. देशभरातून स्थलांतरित मजुरांसोबत अनेक अपघात होत असताना मेळघाटातील या घटनेमुळे आणखी एका घटनेची भर पडली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details