अमरावती - नांदगाव पेठ पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये, गोर गरीब मजुरांचे शोषण होत असून रोजगार उपलब्ध नसल्याने, अल्पशा मानधनावर कामगारांना काम करावे लागत आहे. यामुळे संतप्त व्ही.एच.एम.कंपनीच्या कामगारांनी पगारवाढीसह इतर मागण्यासाठी आजपासून काम बंद आंदोलन पुकारत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
पगारवाढीसह विविध मागण्यांसाठी आजपासून कामगारांचे काम बंद आंदोलन - पगारवाढ
नांदगाव पेठ पंचतारांकित ओद्योगिक वसाहतीमध्ये हजारोच्या संख्यने कामगार काम करत आहेत. या कामगारांना इतर ठिकाणी काम उपलब्ध नसल्याने, याचा फायदा कंपनी चालक घेत असून त्यांना कामाचा मोबदला अत्यल्प दिला जातो. असा आरोप कामगारांनी केला आहे. यामुळे संतप्त १५० हून अधिक कामगारांनी आपल्या विविध मागण्यासाठी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे.
आंदोलक कामगार
नांदगाव पेठ पंचतारांकित ओद्योगिक वसाहतीमध्ये हजारोच्या संख्यने कामगार काम करत आहेत. या कामगारांना इतर ठिकाणी काम उपलब्ध नसल्याने, याचा फायदा कंपनी चालक घेत असून त्यांना कामाचा मोबदला अत्यल्प दिला जातो. असा आरोप कामगांनी केला आहे. यामुळे संतप्त १५० हून अधिक कामगारांनी आपल्या विविध मागण्यासाठी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. आपल्या आंदोलनाची दखल कंपनीने घ्यावी, अशी मागणी कामगांनी केली आहे.
कामगारांच्या 'या' आहेत मागण्या -
- कंपनीने १८ महिन्यानंतर कामगाराला 'पर्मनंट लेटर' द्यावे.
- १८ महिन्यानंतर कामगाराला १५ ते १६ हजार रुपये पगार देण्यात यावा.
- कामगारांना पगाराचे 'पत्र' द्यावे.
- कॅन्टीन सुविधा उपलब्ध करुन द्यावी.
- ओव्हरटाइम टाईम केल्यास त्याप्रमाणे पगार वाढ द्यावी.
- कंपनीने बस सुविधा उपलब्ध करून द्यावी.
- कंपनीचा ड्रेस कोड द्यावा.
- वर्षातून एकदा कर्मचाऱ्यांसोबत बैठक घ्यावी.