अमरावती : अंजनगाव सूर्जी तालुक्यातील कारला या ठिकाणी अमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या अकोला, बुलढाणा जिल्ह्यातील दोन तरुणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. काल सायंकाळी त्यांच्याकडून 57 ग्रॅम एमडी ड्रग्स जप्त करण्यात आले आहे.
सुर्जी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल -काल उशिरापर्यंत ही कारवाई अंजनगाव सुर्जी पोलीस ठाण्यात सुरु होती. सापडलेल्या दोन्ही आरोपी विरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया काल उशिरापर्यंत सुरू होती. राज्यामध्ये अलीकडच्या काळात एमडी ड्रग्स पकडण्याच्या मोहिमेने गती घेतली आहे. परंतु ग्रामीण पोलिसांची ही पहिलीच कारवाई असल्याचे समजते. अलिकडच्या काळात एमडी ड्रग्स पकडण्याची ग्रामीण पोलिसांची ही पहिलीच मोठी कार्यवाही ठरली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २२ वर्षीय दोन तरूण सोमवारी दुपारी अंजनगाव अकोट मार्गावरील कारला येथे एमडी ड्रग्ज विक्रीसाठी घेऊन आल्याची माहिती गस्तीवर असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्या बाबतची माहिती वरिष्ठांना देण्यात येऊन अमरावती ग्रामीण गुन्हे शाखा, अंजनगाव पोलिसांच्या पथकाने सापळा रचून त्या दोघांना दुपारी तीनच्या सुमारास अटक केली.
1.71 लाखांचे ड्रग जप्त -अंजनगाव सुर्जी येथील अंजनगाव अकोट या मार्गावर कारला या गावी पोलिसांना दोन जण ड्रग विकण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्या अधारे दोन बावीस वर्षे तरुण दुपारच्या सुमारास एमडी ड्रग्स विक्रीसाठी घेऊन आले. त्यावेळी गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून त्या दोघांन अटक केली. त्यांच्याकडून 57 ग्रॅम जप्त करण्यात आले आहे. या ड्रगची किंमत 3 हजार रुपये प्रति ग्रॅम आहे. 57 ग्रॅमची एकुण किंमत सुमारे 1.71 लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.