अमरावती : डॉ. नरेंद्र भिवापूरकर अंध विद्यालय येथे 2009 पासून महाराष्ट्र व्यावसायिक मंडळाद्वारे ॲक्युप्रेशर मसाज सर्टिफिकेट अभ्यासक्रम सुरू झाला. या अभ्यासक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना नेमका मसाज कसा करायचा हे शिकवले जाते. तसेच त्यांची परीक्षा देखील घेतली जाते. हे प्रशिक्षण घेणाऱ्यांना महाराष्ट्र व्यावसायिक मंडळाचे प्रमाणपत्र देखील मिळते.
किशोर भड यांचा महत्त्वाचा वाटा :या मसाज सेंटरवर प्रमुख असणारे किशोर भड यांचा हे मसाज सेंटर सुरू करण्यामागे महत्त्वाचा वाटा आहे. विशेष मूळचे अकोला जिल्ह्यातील असणारे किशोर भड यांची 2006 मध्ये झालेल्या वाहन अपघातात दृष्टी गेली. यानंतर ते अमरावतीच्या डॉक्टर नरेंद्र भिवापूरकर विद्यालयात आले. त्यांनी स्वतः सर्वप्रथम मसाज करण्याचे प्रशिक्षण घेतले. यानंतर विद्यालयाचे प्राचार्य इंगोले यांच्यासह अनेकांनी त्यांना मसाज सेंटर सुरू करण्यासाठी प्रेरित केले. किशोर बळी यांनी 2009 मध्ये मसाज संदर्भातील अभ्यासक्रम शाळेत सुरू करायला लावला. किशोर बळी यांनी राज ठाकरे यांची देखील मसाज केली आहे. कुठलाही त्रास असो मसाजद्वारे मी हमखास बरा करून देतो असे अगदी विश्वासाने किशोर भड सांगतात.
2015 पासून सुरू झाले मसाज सेंटर : महाराष्ट्र व्यावसायिक मंडळाच्यावतीने डॉक्टर नरेंद्र भिवापूरकर अंध विद्यालय ॲक्युप्रेशर मसाज अभ्यासक्रमाला 2009 मध्ये सुरुवात झाली. 2015 मध्ये डॉक्टर नरेंद्र भिवापूरकर अंध विद्यालय येथे त्यांचे सेंटर सुरू झाले. या ठिकाणी विद्यार्थ्यांना रोजगार मिळायला लागला. एक विद्यार्थी वर्ष दोन वर्ष या ठिकाणी काम करतो आणि पुढे आपल्या स्वतंत्र व्यवसायासाठी निघून जातो. सध्याच्या घडीला दहा विद्यार्थी या मसाज सेंटरमध्ये काम करीत आहेत.