अमरावती- रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यासाठी मेळघाटात कृषी विज्ञान केंद्र आणि रिलायन्स फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी महिलांसाठी मशरूम लागवडीचे शिबीर भरवण्यात आले होते.
धारणी तालुक्यातील कारा या गावातील महिलाांना मशरूम उत्पादकता व विकास प्रशिक्षणासंदर्भात प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले. यावेळी त्यांना उत्पादनासाठी लागणारे स्पॉन, जंतुनाशक तसेच लागवडीसाठी आवश्यक असणाऱया प्लास्टिकच्या पिशव्यांचे वाटप आयोजकांनी केले.