अमरावती - येथील चांदूर बाजार तालुक्यातील कुऱ्हे गावात कौटुंबीक वादातून विवाहितेचा छळ करून नवऱ्याने व सासऱ्याने रॉकेल टाकून तिला जिवंत पेटवून दिल्याची धक्कादायक घटना घडली होती. काल बुधवारी उपचारादरम्यान या विवाहितेचा अखेर मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेमुळे आरोपी पती गोलू पानसे व सासरा मुन्ना पानसे यांच्याविरोधात शिरजगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यातील कुऱ्हा गावात रोशनी नामक महिलेचा पती गोलू तिला वारंवार तू पसंत नाही, असे म्हणून तिचा नेहमी छळ करत होता. घटनेच्या दिवशी रोशनी स्वयंपाक खोलीत गॅसवर पाणी गरम करत असताना आरोपी पती गोलू पानसे व सासरा मुन्ना पानसे यांनी स्वयंपाक खोलीत जाऊन रोशनीला स्वयंपाक का केला नाही, असे म्हणून तिच्याशी वाद घातला.