अमरावती - कुटुंबातील वादाला कंटाळून विवाहीत जोडप्याने आत्महत्या केल्याची घटना अमरावतीत घडली आहे. चिखलदरा येथील दोन हजार फुट दरीत उडी घेऊन या दोघांनी आत्महत्या केली. राधा आणि गणेश हेकडे असे आत्महत्या केलेल्या जोडप्याचे नाव आहे.
दोन हजार फुट खोल दरीत उडी घेऊन जोडप्याने संपवले जीवन, अमरावतीतील धक्कादायक प्रकार - amravati
घरगुती वादाला कंटाळून राधा तीन आठवड्यापूर्वी तिच्या माहेरी मोथा या गावी निघून गेली होती. गणेशने राधाची समजून काढून तिला परत आणले. परत येताना चिखलदरा येथील दरीत उडी घेऊन त्यांनी जीवन संपवले.
राधा (वय २२) आणि गणेश (वय २५) शहापूर येथील रहिवासी होते. दोन वर्षांपूर्वीच त्यांचे लग्न झाले होते. घरगुती वादाला कंटाळून राधा तीन आठवड्यापूर्वी तिच्या माहेरी मोथा या गावी निघून गेली होती. गणेशने राधाची समजून काढून तिला परत आणले. परत येताना चिखलदरा येथील दरीत उडी घेऊन त्यांनी जीवन संपवले. त्या दोघांना एक छोटा मुलगा आहे.
माहेरच्या घरातून थोड्या अंतरावर आल्यावर राधाने तिच्या काकाला फोन लावला. आम्ही दोघे आत्महत्या करणार असल्याचे तिने सांगितले. यानंतर दोघांनीही त्यांचे फोन बंद करुन ठेवले. त्यामुळे ते त्यांच्या मागावर होते. गणेश आणि राधा दुचाकीवर बसून शहापूरला गेले असे त्यांना वाटले. पण, ते तिथे आढळून न आल्याने त्यांनी चिखलदरा पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी भीमकुंडावर जाऊन पाहणी केली. तेव्हा दोघांनीही आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. या दरीत आधीही आत्महत्या झाल्या आहेत.