महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

APMC of Amravati : बाजार समिती निवडणुकांचा बिगूल वाजला; अमरावती जिल्ह्यातील १० बाजार समित्यांच्या प्रारूप याद्या प्रसिद्ध

बाजार समिती निवडणुकांचा बिगूल वाजला ( Market Committee Elections Will Begin ) आहे. अमरावती जिल्ह्यातील दहा कृषी उत्पन्न बाजार ( APMC of Amravati ) समितीच्या प्रारूप मतदारयाद्या प्रकाशित ( Draft Voter Lists of Ten APMC of Amravati have been Published ) करण्यात आल्या आहेत. प्रारूप मतदारयाद्या सचिवातर्फे जिल्हा उपनिबंधकांकडे सादर करण्यात आल्या होत्या. १२ पैकी तिवसा आणि धारणी बाजार समिती वगळता १० बाजार समित्यांची निवडणूक होणार आहे.

Amravati Apmc Electroral List Published
बाजार समिती निवडणुकांचा बिगूल वाजला

By

Published : Nov 16, 2022, 7:21 PM IST

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील ( APMC of Amravati ) दहा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रारूप मतदारयाद्या प्रकाशित ( Market Committee Elections Will Begin ) करण्यात ( Draft Voter Lists of Ten APMC of Amravati have been Published ) आल्या आहेत. प्रारूप मतदारयाद्या सचिवातर्फे जिल्हा उपनिबंधकांकडे सादर करण्यात आल्या होत्या. १२ पैकी तिवसा आणि धारणी बाजार समिती वगळता १० बाजार समित्यांची निवडणूक होणार असून, २९ जानेवारीला मतदान व ३० जानेवारीला मतमोजणी होणार आहे.

बाजार समितीमधील १८ संचालक पदासाठी निवडणूक :बाजार समितीमधील १८ संचालक पदासाठी ही निवडणूक होणार आहे. यामध्ये सर्वाधिक ११ संचालक, सेवा सोसायटी मतदारसंघातील आहेत. याशिवाय ग्रामपंचायत मतदारसंघात ४, अडते व व्यापारी मतदारसंघात २, याशिवाय हमाल व मापारी मतदारसंघातून प्रत्येकी एक संचालक निवडला जाणार आहे. कोरोना काळात दोन वर्षात बाजार समितीच्या निवडणुका होऊ शकल्या नाहीत.

शासनाने बाजार समिती संचालक मंडळाला तीन वेळा दिली मुदतवाढ :शासनाने बाजार समिती संचालक मंडळाला तीन वेळा मुदतवाढ दिली. तरीही निवडणूक घोषित न झाल्याने अमरावती, भातकुली, तिवसा, मोर्शी, वरूड, चांदूररेल्वे, धामणगाव रेल्वे, नांदगाव खंडेश्वर, चांदूरबाजार, अचलपूर, अंजनगावसुर्जी, दर्यापूर व धारणी या बाजार समितीवर प्रशासक नियुक्त करण्यात आले आहेत. या प्रशासकांच्या सहा महिन्यांच्या कार्यकाळात निवडणुका घेतल्या जातात.


तिवसा व धारणीत अजून निवडणूक नाही : तिवसा, धारणी बाजार समिती आर्थिक डबघाईस आल्याने निवडणूक निधी उपलब्ध करू शकले नाहीत. त्यामुळे या ठिकाणी निवडणुका होणार नाही, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. दहा बाजार समितीची मतदारयादी प्रकाशित करण्यात आली. मात्र, दोन बाजार समित्या तिवसा व धारणी यांनी मतदारयादी घोषित केलेली नाही.

सहकार निवडणूक प्राधिकरणतर्फे मतदार यादी प्रक्रिया :त्यानुसार राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणतर्फे सहा सप्टेंबरच्या आदेशान्वये मतदारयादीची प्रक्रिया राबवली गेली. या मतदारयाद्यांची १४ नोव्हेंबरला प्रसिद्धी करण्यात आली. जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे या मतदारयाद्यांवर २३ नोव्हेंबरपर्यंत आक्षेप हरकती नोंदविता येणार आहे. २३ नोव्हेंबर ते २ डिसेंबरपर्यंत आक्षेप हरकतींवर निर्णय घेण्यात येईल. त्यानंतर जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या उपस्थितीत ७ डिसेंबरला सर्व बाजार समित्यांची अंतिम मतदारयादी प्रकाशित करण्यात येईल.

ABOUT THE AUTHOR

...view details