अमरावती : कोरोना संसर्गमुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका ( Elections of Agricultural Produce Market Committee ) रखडल्या होत्या.परंतु आता जिल्ह्यातील १२ कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये निवडणूकीचा ( 12 Agricultural Produce Market Committees Election ) कार्यक्रम जाहीर झाला आहे. सर्वच बाजार समित्यांमध्ये निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. तब्बल २ वर्षानंतर जिल्ह्यात कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये निवडणूक होत आहे.
जानेवारीला होणार मतदान -सेवा सहकारी ग्रामपंचायत अडते व्यापारी, मापारी अशा चार मतदारसंघांनी आहे जुन्याच पद्धतीने निवडणूक पार पडणार आहे २७ सप्टेंबर पासून मतदार यादी तयार करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. २९ जानेवारी २०२३ रोजी मतदान ( Elections to Agricultural Produce Committee ) होणार असल्याचा संभाव्य कार्यक्रम प्राधिकरण कडून जाहीर करण्यात आला आहे. तरी निवडणुकीच्या तारखेत बदल होण्याची शक्यता सहकार क्षेत्रातील सूत्राकडून वर्तवण्यात आली आहे.
या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये होणार निवडणूक -अमरावती, चांदूरबाजार, अंजनगाव सुर्जी, वरुड ,धामणगाव रेल्वे ,मोर्शी, अचलपूर, नांदगाव खंडेश्वर, धारणी ,तिवसा, दर्यापूर व चांदुर रेल्वे या 12 कृषी उत्पन्न बाजार समितीची मुदत २ वर्षांपूर्वी संपलेली आहे. तब्बल दीड वर्षापासून या बाजार समित्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. मार्चपासून या बाजार समित्यांवर प्रशासक आहेत.