अमरावती- मागील आठवड्याभरापासून अमरावती जिल्ह्यात पावसाने दांडी मारली. आज दुपारच्या सुमारास अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील काकडा गावात दुपारी मुसळधार पाऊस झाला. यात काकडा परिसरातील शेती पावसाच्या पाण्याने धुवून निघाली. शेतीला काही वेळातच तलावाचे स्वरूप आल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. काकडा गावात जवळपास ९० टक्के पेरण्या पुर्ण झाल्या आहेत.
अमरावती जिल्ह्यातील काकडा परिसर जलमय; मुसळधार पावसाने शेतीला तलावाचे स्वरुप - मुसळधार पावसाने हजारो एकर शेती खरडली
अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील काकडा गावात दुपारी मुसळधार पाऊस झाला. यात काकडा परिसरातील शेती पावसाच्या पाण्याने धुवून निघाली. शेतीला काही वेळातच तलावाचे स्वरूप आल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
पावसाने खरडलेली शेती
पावसाने शेती पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागणार आहे. नैसर्गीक संकटातून सावरण्यासाठी शेतकरी आता सरकारकडे बघतो. सरकार नुकसान झालेल्या शेतीचे त्वरित पंचनामे करून शेतकऱ्याच्या पाठीशी उभे राहते का याकडे शेतकऱ्याचे लक्ष लागलेले आहे.