अमरावती- जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाच्या विषाणूपासून बचाव करण्यासाठी समाजात जनजागृती करण्यासाठी अमरावतीच्या एका पेंटरने पुढाकार घेतला आहे. या पेंटरने रस्त्यावर चित्रे काढून आणि सामाजिक संदेश लिहून लोकजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे. मनोज पडोळे असे या पेंटरचे नाव आहे.
कोरोनाच्या जनजागृतीसाठी अमरावतीच्या 'या' पेंटरने रस्त्यावर काढली चित्रे - अमरावती जिल्हा बातमी
कोरोना टाळण्यासाठी मास्क बांधा, गर्दी करू नका, स्वच्छता राखा तसेच हात स्वच्छ धुवा, असे सांगण्यात येत आहे. या सगळ्यांत मास्क बांधणे ही फार महत्वाची बाब आहे. मनोज पडोळे यांनी मास्क बांधलेले चित्र काढून मास्कचे महत्व पटवून दिले आहे.
पेंटरने कोरोनाच्या जनजागृतीसाठी रस्त्यावर काढली चित्रे
कोरोना टाळण्यासाठी मास्क बांधा, गर्दी करू नका, स्वच्छता राखा तसेच हात स्वच्छ धुवा, असे सांगण्यात येत आहे. या सगळ्यांत मास्क बांधणे ही फार महत्वाची बाब आहे. मनोज पडोळे यांनी मास्क बांधलेले चित्र काढून मास्कचे महत्व पटवून दिले आहे.
Last Updated : Mar 29, 2020, 1:04 PM IST