अमरावती - जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथील मानवतावादी क्रांती दलाने लॉक डाऊनच्या काळात गरजूंना मदत करण्यासाठी किराणा साहित्यवाटप सुरू केले आहे. लॉकडाऊन लागू झाल्यानंतर गोरगरीब, कामगार, मजूर वर्गाचे हाल सुरू झाले होते. हाताला काम नसल्यामुळे दोन वेळच्या जेवणाची जुळणी कठीण झाली होती. अशा गरजूंना मदत करण्यासाठी अनेक संस्था, दानशूर व्यक्तींनी विविध उपक्रम सुरू केले आहेत.
मानवतावादी क्रांती दलाचा अभिनंदनीय उपक्रम, गरजूंना किराणा साहित्य वाटप - गर्दीमुळे कोरोना प्रसाराची भीती
लॉकडाऊनच्या काळामध्ये संचारबंदी सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात गोरगरीब जनता रोजगारापासून वंचित झाली आहे. अशा स्थितीत अंजनगाव सुजी शहरातील मानवतावादी क्रांती दलाने जवळपास दोनशे किराणा साहित्याची किट तयार करून सर्वच समाजातील गोरगरीब गरजू लोकांपर्यंत पोहोचवली.
याबाबत माहिती अशी की, लॉकडाऊनच्या काळामध्ये संचारबंदी सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात गोरगरीब जनता रोजगारापासून वंचित झाली आहे. अशा स्थितीत अंजनगाव सुजी शहरातील मानवतावादी क्रांती दलाने जवळपास दोनशे किराणा साहित्याची किट तयार करून सर्वच समाजातील गोरगरीब गरजू लोकांपर्यंत पोहोचवली. संस्थेच्या कार्यकर्त्यांमार्फत गरजू लोकांच्या घरापर्यँत ही किट पोहोचवली जात आहेत.
'संस्था गोरगरिबांना नेहमी मदत करत राहील. गरज पडल्यास अजून मोठ्या प्रमाणात किराणा साहित्याच्या किट तयार करून समाजातील गरजूंपर्यंत दिल्या जातील,' असे अध्यक्ष शफी नियाजी यांनी सांगितले. या कार्यात पालक मान्यवरांनी त्यांना सहकार्य केले आहे. त्यांच्या या उपक्रमाचे नागरिकांनी अभिनंदन केले आहे.