अमरावती -संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य असणाऱ्या प्रा. दिनेश सूर्यवंशी यांचे सदस्यत्व कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांनी अपात्र ठरविले आहे. कुलगुरूंच्या या भूमिकेविरुद्ध आता आपण कायदेशीर लढा देऊ तसेच कुलगुरूंनी आजवर केलेले भ्रष्टाचार उजेडात आणू असा इशारा सदस्यत्व रद्द झाल्यावर संतप्त झालेल्या प्रा.दिनेश सूर्यवंशी यांनी दिला आहे.
व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. दिनेश सूर्यवंशींचे सदस्यत्व कुलगुरूंनी ठरवले अपात्र - प्रा. दिनेश सूर्यवंशी बातमी
मी एक रुपयाचाही भ्रष्टाचार केला नाही. माझ्यावर असा कुठलाही ठपका नसताना कुलगुरूंनी माझ्या बाबतीत बेकायदेशीर निर्णय घेतला आहे. या निर्णयाविरुद्ध मी लढा देईल आणि एक महिन्यात विद्यापीठात परत येणार, अशी आशा व्यक्त करत आता कुलगुरूंनी केलेले सगळे बेकायदेशीर कृत्य चव्हाट्यावर आणणार, असा इशाराही प्रा. दिनेश सूर्यवंशी यांनी दिला.
![व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. दिनेश सूर्यवंशींचे सदस्यत्व कुलगुरूंनी ठरवले अपात्र management council member prof dinesh suryavanshis membership disqualified by vice chancellor](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-9321028-880-9321028-1603724305084.jpg)
2019 मध्ये माझ्या अध्यक्षतेत गठीत समितीचा अहवाल देण्यास उशीर झाला तसेच महाविद्यालय स्तरावर परीक्षा घेण्यास मी विरोध केल्याने माझे सदस्यत्व रद्द करण्यात आल्याचे कारण कुलगुरूंनी दिल्याचे प्रा.दिनेश सूर्यवंशी म्हणाले. मी एक रुपयाचाही भ्रष्टाचार केला नाही. माझ्यावर असा कुठलाही ठपका नसताना कुलगुरूंनी माझ्या बाबतीत बेकायदेशीर निर्णय घेतला आहे. या निर्णयाविरुद्ध मी लढा देईल आणि एक महिन्यात विद्यापीठात परत येणार, अशी आशा व्यक्त करत आता कुलगुरूंनी केलेले सगळे बेकायदेशीर कृत्य चव्हाट्यावर आणणार, असा इशाराही दिला.