महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तिवश्यात भरदिवसा घरात घुसून आई-वडिलांसमोरच तरुणाची निर्घृण हत्या - तिवस्यात तरुणाची हत्या बातमी

तिवसा शहरात आज भरदिवसा अज्ञात मारेकऱ्यांनी घरात घुसून आई-वडीलासमोर एका तरुणावर चाकूने सपासप वार करून निर्घृण हत्या केली. या घटनेनंतर शहरात तणावाची स्थिती निर्माण झाली होती. तर, आरोपी घटनास्थळावरुन पसार झाले असून तिवसा पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

तिवसा येथे भरदिवसा घरात घुसून तरुणाची निर्घृण हत्या
तिवसा येथे भरदिवसा घरात घुसून तरुणाची निर्घृण हत्या

By

Published : Aug 9, 2020, 9:27 PM IST

अमरावती : जिल्ह्याच्या तिवसा शहरात गुंडगिरीचे प्रमाण दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढत चालले आहे. आज(रविवार) दुपारी आंबेडकर चौक येथे दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास एका २८ वर्षीय तरुणाची घरात घुसून हत्या करण्यात आली. कुटुंबियांना बंदुकीचा धाक दाखवून ही हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेनंतर शहरात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. आरोपी घटनास्थळावरुन पसार झाले आहेत. अजय बाबाराव दलाल (वय२८ रा.तिवसा) असे मृत तरुणाचे नाव आहेत.

प्राप्त माहितीनुसार सदर मृत अजय हा रेतीचा व्यवसाय करत होता. दरम्यान, आज तो घरी असताना त्याच्या घरी दुपारी तीन चारचाकी गाड्या आल्या. यानंतर चारजणांनी अजयच्या घरात घुसून त्याच्या मांडीवर सपासप वार केले. तसेच तेथे उपस्थित असणाऱ्या लोकांना बंदुकीचा धाक दाखवत अजयवर चाकूने सपासप वार करून मारेकरी त्याच्या मांडीत चाकू सोडून पळून गेले. दरम्यान, अजयच्या आई-वडिलांनी मारेकऱ्यांना हटकले असता त्यांच्याशी वाद घालून आरोपी अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गाने पळून गेले.

अजय रक्ताच्या थारोळ्यात पडून होता, घटनास्थळी रक्ताचे लोट वाहत होते. गंभीर जखमी अवस्थेत त्याला तिवसा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला जिल्हा ग्रामीण रुग्णालयात नेले असता त्याचा मृत्यू झाला. दरम्यान तिवसा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. अज्ञात आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास तिवसा पोलीस करीत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details