महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अमरावती : पूर्व वैमनस्यातून चुलत भावानेच चाकूने भोकसून केली भावाची हत्या

पूर्व वैमनस्यातून चुलत भावाची चाकूने भोकसून हत्या झाली आहे. ही घटना अमरावती तालुक्यातील वलगाव येथे झाली आहे. याप्रकरणी आठ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला असून यातील मुख्य आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

हत्या
हत्या

By

Published : Sep 2, 2020, 7:14 PM IST

अमरावती -पूर्व वैमनस्यातून चुलत भावाची चाकू भोसकून हत्या केल्याची घटना अमरावती तालुक्यातील वलगाव येथे मंगळवारी (दि. 1 सप्टें) रात्री 10 वाजण्याच्या सुमारास घडली. गोवर्धन काशिनाथ कटकतलवारे (वय 42 वर्षे. रा. भीमनगर), असे मृत व्यक्तीचे नाव आहे. घटनेनंतर पोलिसांनी आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करुन मुख्य आरोपीला अटक केली आहे. घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून वेळीच आरोपीला अटक केली असती तर ही घटना घडली नसती, असा रोष पोलिसांविरोधातील मृताच्या नातेवाईकांनी व्यक्त केला आहे.

गोवर्धन कटकतलवारे व मुख्य आरोपी नितीन कटकतलवारे यांच्यामध्ये गेल्या काही वर्षांपासून वाद सुरू होता. पण, सहा महीन्यांपासून त्यांच्यात वाद आणखीच वाढला. आरोपी नितीनकडून गोवर्धन व त्यांच्या कुटुंबाला जिवे मारण्याच्या देखील धमक्या दिल्या जात होत्या. याबाबत वलगाव पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात देण्यात आली होती. पण, पोलिसांनी आरोपीला अटक करुन त्याविरोधात कठोर कारवाईच केली नाही, असा आरोप गोवर्धन कटकतलवारे यांच्या पत्नी प्रतिभा कटकतलवारे यांनी केला आहे.

घटनेच्या दिवशी नितिनने गोवर्धनला ठार मारण्याची धमकी दिल्याने गोवर्धन आणि त्याचे कुटुंब वलगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानंतर गोवर्धन व त्यांचे कुटुंब घरी येत असताना नितीन व त्याच्या मित्रांनी गोवर्धन यांच्यावर हल्ला चढविला आणि त्याला लाथा बुक्क्यांनी मारहाण सुरू केली. तर नितीनने चाकुने त्यांच्यावर वार केले. यामध्ये गोवर्धन यांचा मृत्यु झाला.

या प्रकरणी प्रतीभा गोवर्धन कटकतलवारे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन नितीन रामदास कटकतलवारे (वय 37 वर्षे), राहुल सुरेश तायडे (वय 32 वर्षे), संदीप प्रभाकर सोनोवने (वय 28 वर्षे), सागर विजय तायडे (वय 28 वर्षे), मंगेश आरुण वाडेकर (वय 33 वर्षे), अरविंद सूर्यभान पळसपगार (वय 47 वर्षे), छोटू ऊर्फ आदित्य रवी कटकतलवारे (वय 20 वर्षे) व राहुल दुर्योधन जाटे (वय 37 वर्षे, सर्व रा. भीमनगर, वलगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी नितीनला अटक केली आहे.

हेही वाचा -तब्बल पाच महिन्यानंतर चिखलदऱ्यातील पर्यटन सुरू

ABOUT THE AUTHOR

...view details