महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Amravati Fraud Case : "तो" अंगावरच्या कपड्यानिशी आला अन् अमरावतीकरांना कोट्यावधींचा चुना लावून गेला - Amravati financial investment fraud case

( Amravati Fraud Case ) अमरावती शहरातील जुना बायपास रोडवरील सामरा नगर नंबर १ येथे गेल्या वर्षभरापासून राजेश पाटील उर्फ चक्रधर लोंढे या इसमाने शेअर मार्केट क्लासेस सुरू केले होते. पाहता पाहता या शेअर मार्केट क्लासमध्ये लोकांची गर्दी जमायला लागली. शेअर मार्केट शिकवतानाच शेअर मार्केटमध्ये असणारे मोठे ट्रेड घेण्याकरिता आपण पैसे गुंतवल्यास तुम्हाला दोन महिन्यात पैसे दुप्पट होतील, असे राजेश पाटील याने सांगितले. लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवत त्यांच्याकडे लाखो रुपये गुंतवले. राजेश पाटील या व्यक्तीने मोबाईल बंद करून ठेवला आणि रातोरात अमरावती शहरातून पोबारा केल्याने गुंतवणूकदारांमध्ये ( Fraud case in financial investment ) एकच खळबळ माजली आहे.

Amravati Fraud Case
अमरावती फसवणूक प्रकरण

By

Published : Dec 14, 2022, 8:46 PM IST

अमरावती : ’खाली हात आयेगा खाली हात जायेगा' ही उक्ती खोटी ठरवत एका महाठगाने अमरावतीकरांना कोट्यवधी रुपयाचा चुनाव लावला लावल्याची घटना उघडकीस आली आहे. शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवल्यास दोन महिन्यात पैसे दुप्पट करून देतो, असे आमिष दाखवून येथील काही गुंतवणूकदारांना त्याने आपल्या जाळ्यात ओढले. सुरुवातीला लाखोंची फसवणूक ( Fraud case in financial investment ) झाली असेल असे वाटत असतानाच हा आकडा आता कोट्यावधीच्या घरात असल्याचे हळूहळू उघड होत आहे. याप्रकरणी काल सायंकाळी काही गुंतवणूकदारांनी पोलिसांकडे धाव घेत राजापेठ पोलीस स्टेशनला तक्रार ( Amravati Fraud Case ) दाखल केली आहे.

सर्वज्ञ शेअर मार्केट क्लासेस : या नावाने जुना बायपास रोडवरील सामरा नगर नंबर १ येथे गेल्या वर्षभरापासून राजेश पाटील उर्फ चक्रधर लोंढे या इसमाने शेअर मार्केट क्लासेस सुरू केले होते. पाहता पाहता या शेअर मार्केट क्लासमध्ये लोकांची गर्दी जमायला लागली. शेअर मार्केट शिकवतानाच शेअर मार्केटमध्ये असणारे मोठे ट्रेड घेण्याकरिता आपण पैसे गुंतवल्यास तुम्हाला दोन महिन्यात पैसे दुप्पट होतील, असे राजेश पाटील याने सांगितले. लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवत त्यांच्याकडे लाखो रुपये गुंतवले ( Amravati financial investment fraud case ). आणि शेवटी व्हायचं तेच झाले.


काही लोकांना दुप्पट पैसेही दिले : आपल्याला शेअर मार्केटचे चांगले ज्ञान असून आपण शेअर मार्केटच्या विविध कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणार आहोत. त्यामुळे अगदी सुरुवातीला काही लोकांनी त्याच्याकडे पैसे गुंतवले. काही लोकांना त्याने दोन महिन्यात चांगला परतावा ही दिला. शेअर मार्केटच्या क्लासेस सोबतच काही धनाढ्य तसेच व्यापारी लोकांकडून पैसे घेण्यात आल्याचेही सूत्रांकडून समजतं. तर काही लोकांना हाताशी पकडून त्यांना अधिकचे आमिष दाखवून गुंतवणूक आणण्यासाठी 20 टक्क्यापर्यंत नफा मिळवून देण्याचे आमिष त्याने दाखवले होते.

महानुभावपंथी असल्यामुळे बसला विश्वास : आपले उत्तर आयुष्य देवाच्या सानिध्यात घालावे अशी आपल्या आई-वडिलांची इच्छा होती. त्या इच्छेपायीच आपण लातूर वरून अमरावती येथे आल्याचे त्याने सांगितले. आपल्याकडे गडगंज संपत्ती असून आपल्याला संपत्तीचा कुठलाही लोभ नाही मला फक्त लोकांचेच भले करायचे आहे. असे सांगून गुंतवणूकदारांना आकर्षित करीत असे. लोकांनी गुंतवलेल्या पैशातून चार चाकी वाहन तसेच सामरा नगर येथे एका घर खरेदीचा इसार केल्याचं समजते.

गुंतवणुकीचा आकडा सांगणे कठीण : राजेश पाटील या व्यक्तीने गुंतवणूकदाराला सुरक्षा ठेव म्हणून काहींना धनादेश दिलेत. परंतु खात्यामध्ये पैसे नसल्याने ते सर्व धनादेश बाऊन्स झाले आहेत. बऱ्याच गुंतवणूकदारांना नोव्हेंबरच्या अखेरीस पैसे परत करायचे होते. परंतु त्या अगोदरच 25 नोव्हेंबरला सायंकाळपासून त्याने आपला मोबाईल बंद करून ठेवला आणि रातोरात अमरावती शहरातून पोबारा केल्याने गुंतवणूकदारांमध्ये एकच खळबळ माजली आहे. शहरांमधील किती लोकांनी त्याच्याकडे गुंतवणूक केली हे अजुन पर्यंतही समजले नाही. त्यामुळेच अमरावती करांची एकूण किती कोटीने फसवणूक झाली हा आकडा सांगणे कठीण आहे.
तक्रार करण्यास सुद्धा लोक पुढे येत नाही. आपली सामाजिक पप्रतिष्ठा लक्षात घेता अजूनही या प्रकरणांमध्ये फसवणूक झालेले गुंतवणूकदार समोर आलेले नाहीत. काही महिलांनी तर आपल्या पतीच्या लपून गुंतवणूक केल्याचे समजते तर काहींनी आपल्या
नातेवाईकाकडून पैसे उसनवार घेऊन गुंतवणूक केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details