अमरावती -कुपोषणाने ग्रासलेल्या मेळघाटात ( Malnutrition in Melghat ) अवघ्या तीन महिन्यात एकूण 52 बालकांचा मृत्यू 52 children died in three months ) झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. उपजत 17 आणि शून्य ते सहा वर्ष वयोगटातील 35 बालकांचा कुपोषणामुळे मृत्यू झाला आहे तीव्र कुपोषणाने 409 चिमुकले पीडित ( 409 infant victims ) असून धारणी ( Dharni ) आणि चिखलदरा तालुक्यात ( Chikhaldara taluka ) या बालकांना वाचवण्यासाठी अंगणवाडी केंद्रातून पोषक आहार देण्याचा खटाटोप सुरू आहे.
पावसाळ्यात परिस्थिती गंभीर -पावसाळ्यात विविध आजारांची लागण ( Infection of various diseases ) होत असल्यामुळे मेघाटातील बालकांचा कमी वजनाने तसेच विविध आजाराने मृत्यू होत असल्याची धक्कादायक बाप समोर आली आहे. धारणी आणि चिखलदरा तालुक्यात न्यायालयाच्या निर्देशानुसार शासनाच्या विविध योजना कार्यान्वित आहेत बालविकास प्रकल्प कार्यालयांतर्गत दोन्ही तालुक्यात 425 पेक्षा अधिक अंगणवाडी केंद्रातून स्तनदा गर्भवती माता व शून्य ते सहा वर्ष वयोगटातील बालकांना पौष्टिक आहार शिजवून दिला जातो आहे.